• Wed. Jul 2nd, 2025

भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

ByMirror

Jun 22, 2025

महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करुन स्वच्छता अभियान


योग ही प्राचीन भारताची देणगी -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाचे धडे गिरवले. तर उपस्थित महिलांनी पर्यावरणाचा संदेश देत वृक्षारोपण केले.


वर्षभर योग आणि पर्यावरण संवर्धन चळवळ चालविणाऱ्या हरदिनच्या वतीने नागरिकांना निरोगी व सदृढ आरोग्यासाठी योग करण्याचे आवाहन केले. यावेळी जॉगींग पार्क परिसरात स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले. योगप्रशिक्षक योगशिक्षक प्रकाश देवळालीकर विनोद मुथा, हेमंत गोयल, विकास भिंगारदिवे यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह सादर करुन विविध आसनांचे शरीरासाठी असलेले फायदे विशद केले. उपस्थित ग्रुपचे सदस्य व नागरिकांनी विविध आसने करुन निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचा निर्धार व्यक्त केला. या योग सोहळ्यात महिलांची देखील उपस्थिती होती.


प्रांजली सपकाळ, संगीता भिंगारदिवे, देवराईकरताई, संगिता सपकाळ, कांताबाई स्वामी, भारतीताई कटारिया यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सीए रवींद्र कटारिया, सीए श्रेयांश कटारिया, अनिल हळगावकर, जहीर सय्यद, रमेश वराडे, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, अभिजीत सपकाळ, संजय भिंगारदिवे, दीपकराव धाडगे, रतनशेठ मेहेत्रे, मनोहर दरवडे, ईवान सपकाळ, सुधीरशेठ कपाळे, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर अनावडे महाराज, अशोक पराते, विठ्ठल राहिंज, संतोष लुनिया, जालिंदर बेरड, दीपकराव बडदे, अनंत सदलापूर, अविनाश जाधव, संजय भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, अविनाश पोतदार, मुन्ना वागस्कर, दीपक मेहतानी, सुभाष पेंढुरकर, शेषराव पालवे, अनिलराव सोळसे, दशरथ मुंडे, योगेश हळगावकर, सचिन हळगावकर, महेश नामदे, सचिन जाधव, प्रज्योत लुनिया, रवींद्र जाजू, दीपक लिपाने, बाळासाहेब धाकतोडे, सुबोध आठवले, अशोक लोंढे, जालिंदर बेल्हेकर, अरुण तनपुरे, दीपक अमृत, किरण फुलारी, राजू कांबळे आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, शरीराचे व पर्यावरणाच्या आरोग्यासाठी योग आणि वृक्षरोपण काळाची गरज बनली आहे. मागील पंचवीस वर्षापासून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य चळवळ चालविण्यात येत आहे. ग्रुपचे पाचशेपेक्षा जास्त सदस्य असून, ते दररोज सकाळी भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये एकत्र येऊन योगा करत असतात. योग ही प्राचीन भारताची देणगी असून, तन, मन, आत्म्याचा समतोल साधणारा मार्ग आहे. निरोगी आरोग्यासाठी नागरिकांना वर्षभर व्यायाम व योग करण्याची गरज आहे. योगने निरोगी राहून व पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावून देशाची सेवा घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद खोत, जयकुमार मुनोत, रामनाथ गर्जे, निजाम पठाण, कोंडीराम वागस्कर, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, सुहास देवराईकर, नामदेव जावळे, दिलीप डुंगरवाल, सागर काबरा, प्रशांत भिंगारदिवे, संदीप शिंगवी, शशिकांत पवार, सदाशिव नागापुरे, महेश सरोदे, सूर्यकांत कटोरे, धनेश पंधारे, देविदास गंडाळ, शिवांश शिंदे, विलास मिसाळ, सतीश सपकाळ, प्रज्योत सागू, संजय शिंगी, योगेश चौधरी, अतुल वराडे, दीपक बोंदर्डे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *