विद्यार्थ्यांनी गिरवले योग-प्राणायामाचे धडे
निरोगी शरीर हीच खरी संपत्ती -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त पद्धतीने धडे देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांकडून करुन घेतले. तर योग, प्राणायाम व ध्यानचे निरोगी आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. यावेळी सहशिक्षिका शितल आवारे, सुरेखा वाघ आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिता काळे म्हणाल्या की, निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. निरोगी जीवनासाठी योग सर्वोत्तम ठरत असून, संपूर्ण जगाने भारताच्या योग-प्राणायामाचा स्विकार केला आहे. योगाने अनेक आजार, विकार बरे होऊन आनंदी जीवनाचा लाभ घेता येतो. अनेक दुर्धर व्याधींवर योग-प्राणायामाद्वारे मात करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.