विद्यार्थ्यांचा योग शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग उपयुक्त -हबीब शेख
नगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयामध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या योग शिबिरात सहभाग नोंदवला.
योगशिक्षक डॉ. सविता कुटे यांनी विविध आसनाच्या प्रात्यक्षिकासह योग व प्राणायमाचे धडे विद्यार्थ्यांना दिले. तर निरोगी आरोग्यासाठी जीवनामध्ये योगाचे महत्त्व विशद केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब शेख, शालेय शिक्षक भरत लगड, संजय गोसावी, शिवाजी धस, सतीश मुसळे, रामदास साबळे, अशोक टकले, सुनीता दिघे, मनीषा वाठोळे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक हबीब शेख म्हणाले की, निरोगी जीवनासाठी योगाचा संपूर्ण जगात स्विकार केला जात आहे. योगाचे महत्त्व पटल्याने आंतरराष्ट्रीय योग दिवस जगात साजरा होत आहे. भारतीयांनी योगाचे महत्त्व ओळखून त्याचा जीवनात समावेश करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.