अबॅकस शिक्षणामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो -संजय कोठारी
देशभरातून 978 विद्यार्थ्यांचा सहभाग; झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 978 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके व सचिव दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.
शहरातील कर्जत रोडवरील साईबन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ-मोठी गणिते झटपटपणे सोडवून अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले. झटपट गणित सोडविण्याची परीक्षा यावेळी रंगली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य संजयजी कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
संजय कोठारी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी अबॅकस आणि वैदिक गणित शिक्षण ही काळाजी गरज आहे. शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा गणित हा विषय सोपा करण्यासाठी त्यांना अबॅकस शिक्षण फायद्याचे ठरते. अबॅकस शिक्षणामुळे मुलांचा सर्वागीण विकास होण्यास मदत होते. देशभरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमी विद्यार्थ्यांना देत असलेल्या अबॅकस व वैदिक गणिताच्या शिक्षणाबद्दल त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते बाळराजे वाळुंजकर यांची विशेष उपस्थिती लाभली. या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले चॅम्पीयन विद्यार्थी विराज घाडगे, शिवप्रताप सोले, कार्तिक तळेकर, स्वप्नेश जमदाडे, कार्तिक आंधळे या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आदित्य तिकटे, आयान पठाण, श्वेता इंगवले, स्वरुप कुलकर्णी, सोहम बन, श्रेया भंडारी, संस्कृती अवसारे, श्रृती गव्हाणे, गुंजन हांगे, श्रेया भोंडवे, निशांत भोसले, सिध्दी काळदाते, सिध्दार्थ दहिफळे, देवेंद्र गव्हाणे, अक्षरा आंधळे, श्रावणी राख, आशिर्वाद पवार, प्रणव इथापे, भुमी घोलप, ध्रुवीका घंटे, यशश्री माकणे, सादफ सय्यद, पार्थ शिरगिरे, नैतिक जाधव या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
अकॅडमीत सर्वोत्कृष्ठ टिचर ट्रेनिंग देणाऱ्या सारिका वारे यांना बेस्ट टिचर ट्रेनर अवॉर्ड, उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या स्मिता मेहेत्रे व मिरा आंधळे यांना स्टार टिचर अर्वार्ड तर अर्चना पवार, रुपाली दहिकर, ज्योती खाडे व स्वप्नाली घोलप या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळभाऊ रकटाटे, माजी कृषी अधिकारी बलभिम शेळके, ॲड. महेश वारे, माजी जि.प. सदस्य मधुकर राळेभात, उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष अमोल तातेड, लेखा परीक्षक बबन मोरे, प्राध्यापक महादेव मोरे, साखर सम्राट अशोक चोरडिया, आरोग्य अधिकारी संपत घंटे, प्राचार्या सोनिया कौर, उपप्राचार्या वृषाली बोराटे, पोलीस प्रशिक्षक नवनाथ मिसाळ, मॅथवल्ड क्लासेस चे संचालक धनंजय भोसले, मुख्याध्यापक सुजित उबाळे, डॉक्टर अभिलाषा भुजबळ, शिक्षिका सुनिता कोल्हे, मुख्याध्यापक दिपक सोले, मुख्याध्यापिका शिल्पा साखरे, चेअरमन नामदेव पाटील वाळके, मॅनेजर कृष्णा पवार, ॲङ कांतीलाल गव्हाणे, ऑडीटर शांतीलाल आजबे, मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे, विजय पवार सर, शिवाजी वाडेकर सर आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रविंद्र रकटाटे, श्रीतेज रकटाटे व सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अकॅडमीची व स्पर्धेची माहिती दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले
