झंवर कुटुंबीयांचे योगदान
भगवान श्रीरामच्या जन्मापासून ते रावणाच्या वधपर्यंतच्या शिल्पाचा वाटिकेत समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरात रामायण वाटिकेच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग शिल्पाच्या कलाकृतीद्वारे जिवंत करण्यात आले आहे. नंदकुमार (मुन्नूशेठ) झंवर व चुन्नीलाल झंवर आणि झंवर कुटुंबीयांच्या वतीने रामायण वाटिका उभारण्यात आली असून, त्याचा लोकार्पण भागवताचार्य युगलशरणजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. भगवान श्रीरामच्या जन्मापासून सीतेच्या स्वयंवर ते भगवान श्रीरामने केलेल्या रावणाच्या वधपर्यंतचे शिल्पाचा या वाटिकेत समावेश आहे.
उद्घाटनाप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, महेश पतसंस्थेचे चेअरमन डॉ. अशोक चेंगडे, डॉ. श्रीकांत गांधी, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, सुधीर कपाले, अभिजीत सपकाळ, अशोक पराते, काशिनाथ शिंदे, अविनाश जाधव, ईवान सपकाळ, शिवांश शिंदे, रवी फुलारे, रामभाऊ झिंजे, नवनाथ वेताळ, जालिंदर अळकुटे, भगवानराव पालवे, प्रांजली सपकाळ, उषाताई ठोकळ, जयश्री शिंदे, आशा गर्जे, सुरेखा फुलारी, सुमिति फुलारे आदींसह महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोकडेश्वर हनुमान मंदिरात दर्शनास येणारे भाविक रामायण वाटिका पाहण्यासाठी गर्दी करत आहे. नंदकुमार (मुन्नूशेठ) झंवर म्हणाले की, रामायण वाटिकेतून भावी पिढीला रामायणाचा इतिहास उलगडणार आहे. शिल्पाच्या माध्यमातून संपूर्ण रामायणातील मुख्य प्रसंग चित्रीत करण्यात आलेले असल्याची माहिती त्यांनी दिली. संजय सपकाळ म्हणाले की, भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिर हे एक जागृक देवस्थान म्हणून ख्याती आहे.
झंवर परिवाराने या मंदिराचा कायापालट करुन विकास केला आहे. त्यामध्ये रामायण वाटिकेच्या माध्यमातून भर पडली असून, भिंगारकरांच्या दृष्टीने उभारण्यात आलेली वाटिका कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
