नेत्रोपचारासह स्पेशालिटी ओपीडी सेवा रूग्णांना एकाच छताखाली उपलब्ध
नेत्र, आहार, मधुमेह, किडनी, त्वचारोग आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांवर मिळणार उपचार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचालित तारकपूर येथील आनंदऋषीजी नेत्रालयात डायबेटिक रूग्णांच्या सेवेसाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबेटिक केअर सेंटरचे लोकार्पण बुधवारी (दि.29 ऑक्टोबर) पार पडले. तारकपूर येथील नेत्रालयाच्या दुसऱ्या शाखेत सुपर स्पेशालिटी ओपीडी सेवा कार्यान्वीत करण्यात आलेली असून, या अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांची टिम रुग्णसेवेसाठी उपलब्ध झाली आहे.
कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबेटिक केअर सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, डॉ. आनंद छाजेड, नेत्रालयाचे विभागप्रमुख डॉ. प्रतिक कटारिया, प्रकाश छल्लाणी, पियुष मंडलेचा, क्लिनिकल आहार तज्ञ डॉ. श्रध्दा परदेशी, मधुमेह तज्ञ डॉ. रवीराज गवळी, प्रमोद गांधी, लॅब टेक्निशीयन सानिया अत्तार, नंदिनी पवार आदी उपस्थित होते.
आनंदऋषीजी नेत्रालयाच्या तारकपूर येथील दुसऱ्या शाखेमुळे सावेडी उपनगरातील रूग्णांना मोठा लाभ होत आहे. आता याच ठिकाणी मधुमेह रूग्णांसाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबेटिक केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे मधुमेह रुग्णांना उच्च दर्जाच्या नेत्रोपचार सेवेसह इतर आजारांवरही उपचार एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मधुमेह पूर्व काळजी, मधुमेह समुपदेशन, आहार समुपदेशन, मधुमेह गुंतागु़त व्यवस्थापन (न्युरोपॅथी, नेफ्रोपॅथी, रेटीनोपॅथी), मधुमेह संबंधित त्वचेच्या समस्या, मधुमेह पायांची काळजी, रक्त व लघवी तपासणी, डायटेशियन कडून मधुमेह रुग्णांनी कोणता आहार घ्यावा, काय खाणे टाळले पाहिजे, कोणते पथ्य पाळले पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
क्लिनिकल आहार तज्ञ डॉ. श्रध्दा परदेशी मधुमेह, नेत्र विकार, किडनी, उच्च रक्तदाब, कॅन्सर, मूत्र विकार, मूतखडा, लठ्ठपणा आदी शारीरिक प्रत्येक आजारांसाठी आहार संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. रवीराज गवळी मधुमेह संदर्भात व डॉ. गोविंद कासाट किडनीच्या आजार संदर्भात रुग्णांना उपचार देणार आहेत.
पुणे येथील त्वचारोग तज्ञ डॉ. रंगोली जिरवानकर दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी त्वचेच्या विकारासंदर्भातील आजारांसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे कॅन्सर तज्ञ डॉ. अनिकेत शिंदे संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत रुग्णांच्या तपासणीकरिता उपलब्ध असतील. तसेच विविध तपासण्या व सर्व औषधांसाठी रुग्णांना खास सवलत उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती तारकपूर येथील आनंदऋषीजी नेत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
आनंदऋषीजी हॉस्पिटलची अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांची टिम आणि नेत्रालयाची तज्ञ डॉक्टरांची टिम एकाच छताखाली उपलब्ध असल्याने डायबेटिक व इतर गंभीर आजारांच्या रूग्णांसाठी तारकपूर शाखा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. या नवीन कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबेटिक केअर सेंटरचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जैन सोशल फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7030959494 व 8686301515 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.
