• Wed. Oct 29th, 2025

राष्ट्रीय पोषण माह व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्यनिमित्त शहरात चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

ByMirror

Sep 22, 2023

सर्व आजारांना दूर ठेवणाऱ्या पौष्टीक तृणधान्य आणि पोषण आहाराची माहिती घेण्यासाठी चित्र प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पोषण माह व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य) वर्ष 2023 निमित्त शहरातील माऊली सांस्कृतिक सभागृह, न्यू टिळक रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.22 सप्टेंबर) उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड व अमहमदनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या हस्ते झाले.


रविवार 24 सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात सर्व आजारांना दूर ठेवणाऱ्या पौष्टीक धान्य आणि त्या धान्यांपासून तयार करण्यात आलेल्या चविष्ट पदार्थांसह सकस आहारांची माहिती, छायाचित्र आणि चित्रफितींच्या (व्हीडीओ) माध्यमातून देण्यात येत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अमहदनगर येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर, माहिती अधिकारी अमोल महाजन, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक संजय गर्जे, उमेदचे सहायक प्रकल्प संचालक सोमनाथ जगताप, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर पाटील. सय्यद शफिक, प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिध्दी अधिकारी पी. कुमार, निवृत्त वरिष्ठ बँक अधिकारी तथा योग शिक्षण विनायक पवळे, दूरदर्शन प्रतिनिधी मनोज सातपूते यांच्यासह शहरातील बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.


यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी आहारातील तृणधान्याचे महत्व, या पौष्टिक धान्यांचा प्रसार व प्रसार तसेच पारंपरिक धान्याच्या उत्पादन वाढीसाठी शासनस्तरावर करण्यात येणारे प्रयत्न याविषयी माहिती दिली. या धान्यांचा आहारात समावेश केल्यास विविध आजारांपासून होणारी सूटका व निरोगी आयुष्यासाठी त्यात असलेल्या जीवनस्तवासह पौष्टीकतेची माहितीही मान्यवरांनी दिली.


सूमारे 5 हजार स्केअरफुट असलेल्या सांस्कृतिक सभागृहात पौष्टक तृणन्यांच्या माहितीसह, या धान्यपासून बवविण्यात आलेले पदार्थ, त्यांचे सत्वगुण, सकस आहार (माता आणि बाळाचा आहार), चित्र फित आणि तृणधान्यांची माहिती असलेलेली छायाचित्रे एलईडी, टीव्हीच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले असून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यत खूले राहणार आहे. या प्रदर्शन स्थळी शहरातील बालविकास प्रकल्प कार्यालयाद्वारे तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या सकस व पौष्टीक आहाराचे प्रदर्शन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे तृणधान्य व त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या पुस्तकांचे वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास भेटी द्यावी असे आवाहन प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *