• Mon. Jan 26th, 2026

लायन्सच्या माध्यमातून नगरकरांच्या सेवेसाठी शीत शव पेटीचे लोकार्पण

ByMirror

Oct 26, 2023

बुथ हॉस्पिटल मधून उपलब्ध होणार उपलब्ध

समाजाची खरी गरजू ओळखून लायन्सचे सामाजिक योगदान सातत्याने सुरू -शरद मुनोत

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांची गरज ओळखून कै. अशोकलाल रसिकलाल बोरा यांच्या स्मरणार्थ बोरा परिवाराने लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लब ऑफ अहमदनगरच्या माध्यमातून नागरिकांसाठी निशुल्क उपलब्ध करुन दिलेल्या शीत शव पेटीचा लोकार्पण सोहळा एव्हँजेलीन बुथ हॉस्पिटलमध्ये पार पडला. एखाद्याच्या दुःखद निधनानंतर नातेवाईक लांबच्या ठिकाणाहून अंत्यविधीला येईपर्यंत मोठा अवधी लागतो. अशा परिस्थितीत मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी शीत शव पेटीची गरज भासत असते. शहरांमध्ये दोन ते तीनच शीत शव पेटी उपलब्ध असल्याने सेवेत नव्याने दाखल झालेली शीत शव पेटीची सेवा नागरिकांना बुथ हॉस्पिटल मधून उपलब्ध होणार आहे.


या शीत शव पेटीचा लोकार्पण ज्येष्ठ उद्योजक शरद मुनोत यांच्या हस्ते झाले. यावेळी लायन्सचे अध्यक्ष धनंजय भंडारे, झोन चेअरमन हरिष हरवानी, सचिव दिलीप कुलकर्णी, खजिनदार नितीन मुनोत, बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, प्रकलप प्रमुख पुरुषोत्तम झंवर, अजय बोरा, आनंद बोरा, मंगलबाई अशोकलाल बोरा, प्रिया बोरा, अंजली बोरा, दिप्ती बोरा, रितिका बोरा, अनया बोरा, अरविंद पारगावकर, हरजितसिंह वधवा, किरण भंडारी, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, कैलाश नवलानी, ऋषिकेश सुकाले, सतीश बजाज, लिओ अध्यक्ष आंचल कंत्रोड, प्रीत कंत्रोड, डॉ. अनघा पारगावकर, अर्पिता शिंगवी, अजित शिंगावी, राजेंद्र गाडेकर, प्रिया मुनोत आदी लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शरद मुनोत म्हणाले की, समाजाची खरी गरजू ओळखून लायन्सचे सामाजिक योगदान सातत्याने सुरू आहे. निस्वार्थ भावनेने गरजूंना आधार देण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी लायन्सच्या विविध सामाजिक कार्याचे कौतुक केले. मेजर देवदान कळकुंबे यांनी कोरोना काळात लायन्स क्लबचे मोठे सहकार्य लाभले. लंगर सेवेत देखील लायन्सचे योगदान महत्त्वाचे ठरले. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी शीत शव पेटी उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


धनंजय भंडारे म्हणाले की, गुरुद्वारा येथे लायन्सच्या माध्यमातून एक शीत शव पेटीची सेवा आजही सुरू आहे. शहरात मोजक्याच शीत शव पेट्या असल्याने गरज भागवण्यास मोठी अडचण निर्माण होत होती. यासाठी लायन्सच्या माध्यमातून आनखी एक शीत शव पेटी उपलब्ध करण्यात आली आहे. दुःखद घटनेच्या वेळी नातेवाईक येईपर्यंत सोय होणार आहे. उन्हाळ्यात याची अधिक गरज भासणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही व्यवस्था खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना निशुल्क उपलब्ध करण्यात आली असून, बुथ हॉस्पिटलच्या माध्यमातून ही शीत शव पेटी नाममात्र देखरेख शुल्क आकारुन उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्षा डॉ. सिमरन वधवा यांनी केले. आभार प्रिया बोरा यांनी मानले. शीत शव पेटीसाठी बुथ हॉस्पिटल येथील बाळासाहेब पठारे 8482936914 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *