• Sat. Jul 19th, 2025

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांना तात्काळ अटक करा

ByMirror

Feb 28, 2024

विवाहितेच्या आईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांना तात्काळ अटक करण्याची मागणी विवाहितेची आई बीबी मीरसाब शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


बीबी शेख यांची मुलगी यास्मीन चे लग्न आदम शेख यांच्याशी झाले आहे. सासरच्या लोकांनी तिला जबर मारहाण करून औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे पती आदम शेख, दीर अल्ताफ शेख व भाऊजाई शैनाज शेख यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झालेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा बीबी शेख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *