सायन्स व कॉमर्सचा शंभर टक्के निकाल
वैष्णवी मेहेत्रे व आर्यन बोरा शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावी बोर्डाच्या (एचएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा सायन्स व कॉमर्स दोन्ही विभागांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या दोन्ही विभागात पहिल्या पाच क्रमांकाने शाळेच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, सल्लागार समितीचे सदस्य भूषण भंडारी, विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक पोपट पवार, पर्यवेक्षक बाळू वाव्हळ, विष्णु गिरी, कैलास साबळे आदींसह गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
वैष्णवी प्रशांत मेहेत्रे हिने 91.50 टक्के गुण मिळवून सायन्स विभागात विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर आर्यन कैलास बोरा याने 95.67 टक्के गुण मिळवून कॉमर्स विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाहक गौरव फिरोदिया यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एचएससी शास्त्र विभाग
प्रथम- वैष्णवी प्रशांत मेहेत्रे हिने 91.50 टक्के गुण (इंग्रजीत 91 गुण), द्वितीय- यशस्वी रवी साखला 88.83 टक्के (डीजी व जीएस विषयात 200 पैकी 199 गुण), तृतीय- भूषण तखतमल गुगळे 83.33 (मराठीत 93 गुण), चौथी- प्राजक्ता विलास शिंदे 80.83 टक्के (भौतिक शास्त्र 83 व रसायनशास्त्र 92 गुण), पाचवी- वैभवी नितीन रसाळ 79.50 टक्के (समाजशास्त्र 91 गुण).
एचएससी कॉमर्स विभाग
प्रथम:- आर्यन कैलास बोरा याने 95.67 टक्के (अकौटन्सी, मॅथ्स व आयटीत 100 पैकी 100 गुण), द्वितीय- आकांक्षा सचिन कटारिया 93.83 टक्के (इंग्रजीत 92 गुण), तृतीय- श्लोक सचिन बोरा 93.33 टक्के, चौथा- प्रेम आनंद कोठारी 92.83 टक्के, दिया जतिन मेहेता 91.67 टक्के (अर्थशास्त्र 97 गुण) पार्थ मंगेश चंगेडिया, स्मित संतोष गुगळे या विद्यार्थ्यांनी बुक कीपिंग ॲण्ड अकाउंटन्सी या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.