शिवसेना व युवा सेनेच्या वतीने 10वी व 12वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रोत्साहन व दिशा देण्यासाठी दरवर्षी गुणवंतांचा सन्मान -योगेश गलांडे
गर (प्रतिनिधी)- शिवसेना व युवा सेनेच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या नवनागापूर येथील श्रमिक कष्टकरी, कामगार वर्गातील पाल्यांसह परिसरातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्याचे आयोजन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, नवनागापूरचे सरपंच बबनराव डोंगरे, माजी उपसरपंच नरेश शेळके, शिवसेना जिल्हा प्रमुख आकाश कातोरे, शिवसेना संघटक अमोल हुंबे, अध्यक्ष दत्ता तापकिरे, ग्रामपंचायत सदस्य दिपक गिते, ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ गव्हाणे, चेअरमन बाबासाहेब डोंगरे, विवेक घाडगे, सुनील शेवाळे, शंकर शेळके, प्रा. सचिन पुंड, स्वप्नील खराडे, प्रदिप दहातोंडे, अभिजित सांबरे, जितेंद्र तळेकर, किसन तरटे, वसीम शेख, सचिन खेसे, संतोष शेवाळे, महेश लांडगे,सचिन भुसारे,संतोष वाघमारे, कृष्णा सत्रे, चंद्रकांत मोरे, महेश काळे, सोमनाथ बारबोले, निलेश शेवाळे, सोमनाथ आंधळे आदींसह गुणवंत विद्यार्थी, पालक वर्ग व शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे म्हणाले की, दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन व योग्य दिशा देण्याचे कार्य युवा सेना करीत आहे. नवनागापूर व एमआयडीसी भागातील सर्वसामान्य कामगारांच्या मुलांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून हे उपक्रम सुरू असून, शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम समाज घडविण्याचे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात योगेश गलांडे म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व दिशा देण्यासाठी दरवर्षी गुणवंतांचा सन्मान केला जातो. नवनागापूर, एमआयडीसी भागात सर्वसामान्य कामगारांच्या मुलांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पाठबळ दिले जात असून, यामुळे सक्षम समाज घडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिलीप सातपुते म्हणाले की, भविष्यातील ध्येय विद्यार्थ्यांनी आत्ताच ठरवावे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. मार्केट व भविष्यातील गरज ओळखून त्या क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे. करिअरच्या अनेक संधी असून, विविध कोर्स उपलब्ध झाले आहेत. स्पर्धेच्या युगात एखादे अपयश आले तरी, निराश होऊ नये. आई, वडील व कुटुंबाची काळजी घेऊन वाटचाल करावी. जीवनात किती उंचीवर गेले व कोणते करिअर केले, यापेक्षा कुटुंबाला किती आनंद दिला? हे महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, मराठी माध्यमांच्या शाळेत शिकून देखील अनेक मोठे अधिकारी झाले आहेत. जीवनात शिक्षण महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी चांगले नागरिक तयार करणे महत्त्वाचे आहे. चांगले नागरिक शिक्षणापासून घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सर्वसामान्य परिस्थितीमधून मोठे झाल्यावर समाजासाठी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख गव्हाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर शेळके यांनी मानले.
गौरविण्यात आलेले गुणवंत विद्यार्थी
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत 80% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पुर्वा दहातोंडे, ज्ञानेश्वरी काळे, कृष्णा तळेकर, ओम बागल, वेदांत सत्रे, शिवम काळे, श्रेयस गायकवाड, भावेश म्हस्के, साहिल वाघमारे, सार्थक भुसारी, आदित्य पारखे, अनिशा कोठावळे, अस्मिता राऊत, नम्रता लहारे, भक्ती झिने, निकिता गवळी, अंकिता सिंग, रितेश सहानी, प्रांजली सानप, खुशी गुलवे, साई झिने, श्रद्धा झिने, तन्मय आढाव, मानसी लहारे, श्रीराज बनकर, ओंकार जाधव, वेदांत पोकळे, अक्षदा लहारे, चैत्राली काकडे, नितु हिदुले, चैतन्य ठाणगे, अनुष्का शेळके, श्रेया देशपांडे, उपासना ढोकचवळे, ऋषिकेश चौहान, हर्षद वाघ, प्राची सानप, प्राची चौधरी, सम्राट काळे, प्रतिक्षा शिंदे, दुर्वेश देशमुख, अपेक्षा कदम, ओम भोसले, सौरभ कापसे, समृद्धी कडूस, सम्राट पाटोळे, श्रेया हंपे, श्रेयस वामन, आदित्य गव्हाणे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.