शिक्षणाने ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -सनी खरारे
नगर (प्रतिनिधी)- प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन जयपूर, राजस्थान येथील विद्यापिठात मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन (एमबीए) ची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्याबद्दल भिंगार येथील युवक तेजस बचाटे यांचा सामाजिक कार्यकर्ते सनी खरारे यांनी सन्मान केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, सामाजिक कार्यकर्ते विलास भोसले, मिलिंद बचाटे, मेजर भरत बुधवंत, गोविंद घोडके, धीरज बैद, विकास पंडित, लीलाबाई नामदेव बचाटे, शुभांगी बचाटे (आई), सुनील गेणुजी बचाटे (वडील), वैष्णवी बचाटे आदी उपस्थित होते.
सनी खरारे म्हणाले की, शिक्षणाने ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास परिस्थिती आडवी येत नाही. तेजस बचाटे यांनी सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येऊन आपले उच्च शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्याला शिक्षणासाठी आई-वडिलांनी दिलेली साथ मोलाची आहे. परिस्थितीवर मात करुन त्याने मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना तेजस बचाटे यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी, मार्ग निघत जातात. जीवनाच्या यशात कुटुंबीय व मित्र परिवाराची साथ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
