• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहर भाजपच्या वतीने सविता कोटा यांचा सन्मान

ByMirror

Feb 7, 2025
एक हजार सभासद नोंदणीचा टप्पा केला पूर्ण

एक हजार सभासद नोंदणीचा टप्पा केला पूर्ण

कोटा यांनी घरोघरी जावून सभासद नोंदणीचे केलेले कार्य दिशादर्शक -ॲड. अभय आगरकर

नगर (प्रतिनिधी)- शहरात घरोघरी जावून तसेच महिलांशी संवाद साधून एक हजार सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा यांचा भाजप कार्यालयात सन्मान करण्यात आला.
सर्वाधिक सभासद नोंदणी केल्याबद्दल भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी सविता कोटा यांचा सत्कार केला. यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, शहर जिल्हा उपाध्यक्ष संध्या पावसे, शहर जिल्हा चिटणीस बंटी ढापसे, राखी आहेर, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, युवा मोर्चाचे अध्यक्ष मयूर बोचुघोळ, अल्पसंख्यांक अध्यक्ष साहिल शेख, महिला मोर्चाचे उपाध्यक्ष निता फाटक, महिला मोर्चाचे सरचिटणीस ज्योती दांडगे, अनिल निकम, सचिन कुसळकर, अमोल निस्ताने, विनोद बोगा, करण भाऊ, धीरडे काका आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


ॲड. अभय आगरकर म्हणाले की, संपूर्ण शहर भाजपमय करण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी अभियानात सहभाग नोंदवला. घरोघरी, महाविद्यालय, विविध व्यावसायिक, व्यापारी व विविध संस्थेत जाऊन ऑनलाईन सभासद नोंदणी करण्यात आली. इच्छुक नागरिकांना देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपचे सदस्य बनवून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सविता कोटा यांनी सभासद नोंदणी केलेले कार्य दिशादर्शक असून, घरोघरी जावून त्यांनी भाजपचे विचार व कार्य पोहचवून त्यांना सभासद करुन घेतल्याचे त्यांनी सांगितले.


सत्काराला उत्तर देताना सविता कोटा यांनी हर घर सदस्य नोंदणीच्या माध्यमातून नागरिकांना भाजपशी जोडण्यात आलेले आहे. कल्याणकारी राज्यामुळे भाजपकडे सर्वसामान्य जनता आकर्षित होत आहे. भाजपने आपल्या सत्तेत सर्वसामान्य नागरिकांना आधार दिला. तर लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान मिळवून दिला आहे. यासाठी नागरिकांमधून सदस्य होण्यासाठी मागणी वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एक हजार सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल भाजपचे प्रदेश अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा ताई वाघ यांनी कोटा यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *