• Thu. Oct 16th, 2025

केडगाव मधील दहावी बोर्डातील गुणवंतांचा सन्मान

ByMirror

Jun 26, 2024

ज्ञानसाधना गुरुकुलची नक्षत्रा ढोरसकर केडगावमध्ये अव्वल

अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल व लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ज्ञानसाधना गुरुकुलमध्ये शिकत असलेली नक्षत्रा ढोरसकर 97.20 टक्के गुण मिळवून प्रथम तर पूर्वा ढोरसकर 95 टक्के गुण मिळवून द्वितीय व गौरव चंगेडिया 94.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे संगणक, सायकल व शैक्षणिक साहित्याचे बक्षिस देण्यात आले.


त्याचबरोबर विशेष योग्यता प्राप्त करणारे साक्षी विधाते (93 टक्के), गौरी बनसोडे (92 टक्के), विराज पटवा (92 टक्के), खुशी देशपांडे (91 टक्के), काजल सैनी (90 टक्के), ज्ञानेश्‍वरी पालवे (89 टक्के), हार्दिक कोतकर 88 (टक्के), आशिष आघाव (87.60 टक्के), पूनम कानफाडे (87 टक्के), आदिनाथ येळकर (87 टक्के), श्रद्धा कदम (86.40 टक्के), श्‍वेता सत्रे (85 टक्के), कार्तिक सूळ (84 टक्के), प्रियंका गोल्हार (84 टक्के), आकाश पालवे (83 टक्के), समीक्षा लहाने (83 टक्के), ऋतिका दहिफळे (83 टक्के), ज्ञानेश्‍वरी वाव्हळ (82 टक्के), क्षितिज साठे (82 टक्के), आदेश दळवी (82 टक्के), जानवी शिपनगर (82 टक्के), तेजस डमाळे (81 टक्के), कार्तिकी चिपाडे (81 टक्के), यश राऊत (81 टक्के), निशा कोतकर (80 टक्के) यांचा सन्मान करण्यात आला.


हा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम प्रा. गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रा. शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे जिद्दीने अभ्यास केला, तर त्यांना यश नक्कीच मिळणार. फक्त चांगले टक्केवारी पडले म्हणजे विद्यार्थी यशस्वी होतो, असे नाही. तर त्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्य असणे खूप आवश्‍यक आहे. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना पाच मुलमंत्र आपल्या व्याख्यानातून विविध उदाहरणांमार्फत सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले की, ज्ञानसाधना या इवल्याश्‍या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून, या वटवृक्षाखाली अनेक गुणवंत विद्यार्थी घडत आहे. नुसतेच शिक्षण नाही, तर संस्कार देखील रुजवण्याचे कार्य ज्ञानसाधना परिवार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


इलाक्षी ह्युंदाईचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार म्हणाले की, मुलांना पाहून माझ्या लहानपणी चिंचेच्या झाडाखाली शिक्षण घेतल्याची आठवण झाली. या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उद्योजक जालिंदर कोतकर, संभाजी पवार, छबुराव कोतकर, मुख्याध्यापक संदीप भोर, गोरख कोतकर, सुमित लोंढे, विक्रम लोखंडे, प्रवीण आव्हाड, दीपक तागडे, अण्णासाहेब शिंदे, शाहरुख शेख, प्राचार्या रुचिता जमदाडे, प्रमिला लोखंडे, रोहिणी कोतकर, शबाना शेख, कोमल शिंदे, प्रतीक्षा फुलारी, सुवर्णा दाणी, गीता रणखांब आदी शिक्षकांसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रसाद जमदाडे यांनी केले. आभार लंडन प्री स्कूलचे प्राचार्या रुचिता जमदाडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *