कवी व लेखकांच्या वतीने पुस्तकांची भेट देऊन सत्कार
नगर (प्रतिनिधी)- नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठी सहा राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी करुन निमगाव वाघा (ता. नगर) येथे सातव्या काव्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल काव्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांचा कवी व साहित्यिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
लेखक तथा कवी बाळासाहेब देशमुख यांनी द माउंटन मॅन हे पुस्तक व कवियत्री सरोज आल्हाट यांनी इंप्रिंट्स ऑफ नेचर ॲण्ड माय सोल या इंग्रजी काव्यसंग्रहाची भेट देऊन डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून पै. नाना डोंगरे काव्य संमेलनाच्या माध्यमातून कवींना प्रोत्साहन देण्याबरोबर सामाजिक विषयांवर देखील जागृती करत आहे. नवोदित व ज्येष्ठ कवींना व्यासपिठ निर्माण झाला असल्याची भावना लेखक बाळासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली.
सरोज आल्हाट म्हणाल्या की, ग्रामीण भागातील साहित्यिक कवींना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आले आहे. पै. नाना डोंगरे निस्वार्थ भावनेने सामाजिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे. सातत्याने धडपड करणारे व विविध उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.