• Wed. Oct 15th, 2025

विविध क्षेत्रातील गुणवंत, आदर्श शिक्षक व जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

ByMirror

Sep 23, 2025

चर्मकार विकास संघाच्या गुणगौरव सोहळ्यातून समाजबांधवांना प्रेरणा -खासदार भाऊसाहेब वाकचौरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील गुणी विद्यार्थी, कर्तुत्ववान व्यक्ती, आदर्श शिक्षक तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याचा गुणगौरव केल्यामुळे त्या व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते. यामुळे पुढील काळात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. समाजबांधवांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने व समाजाला संघटित करण्यासाठी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काढले.


चर्मकार विकास संघ आणि लोकनेते आमदार सीतारामजी घनदाट मामा सामाजिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार वाकचौरे बोलत होते. शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चर्मकार ऐक्य संघाचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, चर्मकार विकास संघाचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जेष्ठ विनोदी कथा कथनकार संजय कळमकर, चर्मकार ऐक्यचे कार्याध्यक्ष डॉ.वसंतराव धाडवे, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, चर्मकार विकास संघ जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, वाल्मिक साबळे, लोकनेते सीतारामजी घनदाट मामा सामाजिक प्रतिष्टानचे सर्जेराव गायकवाड, रामराव ज्योतीक, मछिंद्र दळवी, राजेंद्र धस, अण्णासाहेब खैरे, सौ. प्रतिभा संजय खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे खासदार वाकचौरे म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्याला काहीच अर्थ नाही. या नोकरीत सेवकाला कोणतीच अशी शाश्‍वती नाही. त्यामुळे नोकरीच्या भानगडीत न पडता व्यवसाय करा. चर्मकारांसाठी समाज कल्याण खात्याच्या योजनांमध्ये काही अर्थ नाही, त्या कधीच हद्दपार झालेल्या आहेत. सरकारच्या कृषी, दुग्ध, वाणिज्य, औद्योगिक विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावर उभे रहाण्याचे त्यांनी आवाहन केले.


कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज यांना अभिवादन व दीप प्रज्वलन करून महाआरतीने झाली. संत रविदास महाराज यांची 3 फूटी मूर्ती मच्छिद्र दळवी यांनी संत रविदास विकास केंद्रासाठी भेट दिली. त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.आमदार काशिनाथ दाते यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी त्यांचा सन्मान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना पुरस्काराचे प्राप्त आदर्श शिक्षक यांची जबाबदारी वाढली असून, सामाजिक कार्यात योगदान देण्याचे सांगितले.


यावेळी एकनाथ कानडे व देवराव तांबे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन समाजातील 51 शिक्षक व शिक्षिकांना आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तसेच येरवडा कारागृहाचे जेलर रेवणनाथ कानडे यांचा पदोन्नतीबद्दल, प्रांजली आंबेडकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल, तर बारामती इथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अनिल शेलार यांचा सन्मान करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त अशोक कांबळे यांचा सन्मान पार पडला.


यावेळी रामदास सोनवणे, अरुण गाडेकर, कारभारी देव्हारे सर, कवी सुभाष सोनवणे, रुक्मिणी नन्नवरे, संगीता वाकचौरे, रामदास सातपूर, अरविंद कांबळे, सुरेश शेवाळे, अर्जुन वाघ, संजय गुजर, संतोष कंगणकर, विनोद कांबळे, रुपेश लोखंडे, मनीष कांबळे, संतोष कांबळे, दिलीप कांबळे, दिनेश देवरे, गणेश हनवते, राजाराम केदार, भाऊसाहेब आंबेडकर, हेमलता कांबळे, आकाश गायकवाड, संतोष खैरे, मनोज गवांदे, अकाश गायकवाड, बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते. हा गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *