अमानुषपणे झालेल्या मारहाणीचा निषेध करुन आरोपींना कठोर शिक्षा होण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- कबुतरे, शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन मागासवर्गीय समाजातील चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे टांगून क्रूरपणे मारहाण झालेल्या हरेगावला (ता. श्रीरामपूर) येथील पिडीत मुलांची बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून विचारपुस केली. तर अमानुषपणे झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवून, सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.

बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी पीडित युवकांशी चर्चा केली. तर या प्रकरणी सरकारी वकिलांची भेट घेवून त्यांच्याशी देखील या प्रकरणाबाबत माहिती घेतली.
यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी राजू खरात, श्रीरामपूर विधानसभा प्रभारी सुनील मगर, श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष जाकिर शहा, शहराध्यक्ष आकाश शेंडे, विधानसभा महासचिव मच्छिंद्र ढोकणे, श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष राहुल छत्तीसे, महासचिव राष्ट्रभूषण घोडके, श्रीगोंदा युवक संघटनेचे अभिषेक ठोकळे, संदिप कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.