• Mon. Jan 26th, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा आरोग्याची गुढी उभारुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ByMirror

Apr 9, 2024

ग्रुपचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण विविध सामाजिक उपक्रमाचे नियोजन

योगा, प्राणायाम, वृक्षरोपण व स्वच्छता अभियानाने मराठी नववर्षाची सुरुवात

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देवून आरोग्य व पर्यावरण चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त मंगळवारी (दि.9 एप्रिल) निरोगी आरोग्याची गुढी उभारुन वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ग्रुपला चोवीस वर्ष पूर्ण होवून पंचविसाव्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी मराठी नववर्षाची सुरुवात योगा, प्राणायाम व वृक्षरोपणाने करुन या चळवळीत सर्व नागरिकांना सहभागी करुन घेण्याचा व विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.


भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. तर जॉगिंग पार्कच्या हिरवळीवर नागरिकांनी योग, प्राणायाम केला. प्रारंभी गौतम बुद्धांना अभिवादन करून उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कापड व्यापारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी सचिन चोपडा यांची निवड झाल्याबद्दल, नृत्य विशारद आश्‍लेषा पोतदार यांनी नृत्य क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल व अरविंद ब्राह्मणे यांच्या पुस्तकास पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी पार्वती रासकर, उषाताई ठोकळ, प्रांजली सपकाळ, राजश्री राहिंज, भारती कटारिया, सीमा केदारे, मनीषा बोगावत, सुरेखा आमले, संगीता सपकाळ, मीनाताई परदेशी, आरती बोराडे, मनिषा शिंदे, मालंदा हिंगणे, सुजाता भिंगारकर, शैलाताई पोतदार, कविता भिंगारदिवे, निर्मला पांढरे, ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, शंकर बहिरट, सचिन थोरात, सुमेश केदारे, सीए. रवींद्र कटारिया, दिलीप ठोकळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, सचिन चोपडा, दिलीप गुगळे, अभिजीत सपकाळ, अशोक लोंढे, जहीर सय्यद, विठ्ठल राहिंज, अशोक पराते, संजय भिंगारदिवे, दीपक अमृत, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, नामदेव जावळे, अविनाश पोतदार, सुंदरराव पाटील, सुभाष पेंढुरकर, प्रफुल्ल मुळे, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, सदाशिव नागापूरे, संपत बेरड, विलास आहेर, किशोर भिंगारकर, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, अविनाश जाधव, प्रकाश देवळालीकर, दिलीप बोंदर्डे, संतोष हजारे, सुनील झोडगे, राजू कांबळे, अनिल सोळसे, सूर्यकांत कटोरे, किरण फुलारी, दिनेश शहापूरकर, रतन मेहत्रे, विशाल बोगावत, संतोष लुनिया, रमेश कोठारी, जयकुमार मुनोत, इवान सपकाळ, जालिंदर बेल्हेकर, सुधीर कपाळे, ॲड. सचिन चिमटे, नवनाथ वेताळ, जालिंदर अळकुटे, कुमार धतुरे, मुन्ना वाघस्कर, प्रकाश भिंगारदिवे, भरत कनोजिया, सुभाष थोरात आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर सकाळी व्यायाम व योग केला जातो. या आरोग्य चळवळीबरोबर वृक्षरोपण व संवर्धन करुन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले जात आहे. पाडव्याच्या मुहुर्तावर चोवीस वर्षापूर्वी या ग्रुपची मुहुर्तमेढ रोवण्यात आली होती. ग्रुपच्या माध्यमातून अविरतपणे सामाजिक कार्य सुरू असून, विविध सण, उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरे करण्यात येतात. मोफत आरोग्य, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेवून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आधार दिला जात आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना एकत्र करुन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरण व आरोग्य चळवळ चालवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमासाठी तुषार धाडगे, महेश सरोदे, गोकुळ धाडगे, श्‍यामराव थोरात, किशोर धाडगे, दत्तात्रय लाहुंडे, नवनाथ खराडे, अनंत सदलापूर, राजेंद्र पांढरे, मच्छिंद्र जाधव, बाबासाहेब नागपुरे, बाळासाहेब झिंजे, प्रशांत भिंगारदिवे, मंगेश मोकळ, राम झिंजे, अश्‍विन जामगावकर, प्रदीप पिपाडा, विजय गांधी, विशाल भामरे, भाऊसाहेब झांबरे, अजय खंडागळे, विकास निमसे, संजय नायडू, योगेश चौधरी, सिद्धू बेरड, हरी शेलार, अनिल ताठे, सुरेश भगत, दशरथ मुंडे, रणजीत अकसाळ आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *