पत्रकार समाजाचा आरसा -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मराठी पत्रकार दिवस वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. शहरातील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.
वृत्तछायाचित्रकार वाजिद शेख व माध्यम प्रतिनिधी जहीर शेख यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर प्रा. सलाबत खान यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक भान जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सर्वेश सपकाळ, दिलीपराव ठोकळ, सचिन चोपडा, दीपकराव धाडगे, मनोहर दरवडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अभिजीत सपकाळ, दीपकराव घोडके, सुधीर कपाळे, विलास आहेर, दिलीप गुगळे, अविनाश जाधव, संतोष हजारे, गोरख लीपाणे, इंजि. अनिल सोळसे, अजेश पुरी, सुभाष पेंढूरकर, किरण फुलारी, तुषार घाडगे, दशरथ मुंडे, कुमार धतुरे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, सखाराम अळकुटे, देविदास गंडाळ, महेश सरोदे, अनिल हळगावकर, अरुण भोसले, प्रशांत भिंगारदिवे, दीपक अमृत, वंश नरवाल, विराट बिल्लरवाल आदी मान्यवर व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, “मराठी पत्रकार दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून, पत्रकारांच्या सामाजिक योगदानाची जाणीव करून देणारा दिवस आहे. समाजाला दिशा देण्याचे, सत्य मांडण्याचे आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार सातत्याने करीत असतात. म्हणूनच या दिवशी केवळ सत्कार न करता, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे वृक्षारोपण करण्यात आले. पत्रकार समाजाचा आरसा आहे. संघटनेच्या समाजहिताचे उपक्रम जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम पत्रकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. सलाबत खान म्हणाले की, आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण काळात पत्रकारांची भूमिका अधिक जबाबदार बनली आहे. सत्य, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार काम करत आहेत. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करून हा दिवस साजरा करणे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जागृती या दोन्ही गोष्टी आज काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
