खासदार सुजय विखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
महाराजांच्या भव्य पुतळ्याने वेधले लक्ष
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वस्तिक चौक येथील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्ण कृती पुतळ्यास खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणला.
प्रारंभी जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, आकाश कातोरे, माजी महापौर शिलाताई शिंदे, नगरसेविका अश्विनी जाधव, शहराध्यक्ष ॲड. पुष्पा येळवंडे, सलोनी शिंदे, तृप्ती साळवे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, आशिष (मुन्ना) शिंदे, अमोल हुंबे, पोपटराव पाथरे, आनंद शेळके, पवन कुमटकर, विजय चव्हाण आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिल शिंदे म्हणाले की, शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवसेनेची मिरवणुक आकर्षण ठरणार आहे. मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांसह घोडेस्वार, बॅण्ड पथक व धाडसी खेळाचे कवायतीचा समावेश आहे. शिवसेना शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करत असून, हे विचार समाजात रुजविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, शिवसेना हिंदुत्वाचे विचार रुजवून महाराजांच्या आदर्शाने योगदान देत आहे. आदर्श राज्याची संकल्पना सत्यात उतरविण्याचे काम राज्य सरकार करत आहेत. मुघलांच्या विरोधात महाराजांनी पराक्रम दाखवून स्वराज्य निर्माण केले. देश वाचवण्यासाठी महाराजांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नगर-पुणे महामार्गावरील स्वस्तिक चौकात अभिवादनसाठी ठेवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सर्वांचे लक्ष वेधले. नागरिकांसह युवक-युवती पुतळ्याबरोबर छायाचित्र घेण्यास गर्दी केली होती.