• Sat. Apr 12th, 2025

आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

ByMirror

Apr 11, 2025

समाजाच्या प्रगतीसाठी महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करुन पुढे जावे -आयुक्त यशवंत डांगे

नगर (प्रतिनिधी)- आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. माळीवाडा वेस येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते, पंडितराव खरपुडे, अशोक कानडे, ज्ञानेश्‍वर (मामा) रासकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे अमित खामकर ,डॉ. उध्दव शिंदे, विष्णुपंत म्हस्के, बजरंग भुतारे, अजय दिघे, डॉ. रणजित सत्रे, अशोक हिंगे, सुरज शहाणे, आकाश पांढरे, संतोष हजारे, रेणुका पुंड, बेबीताई गायकवाड, सुरेश कावळे आदी उपस्थित होते.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्रांती केली. शिक्षणची शक्ती त्यांनी जाणल्यामुळे बहुजन समाजासह महिलांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नाने महिलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. मुलींसाठी शाळा काढून स्त्री सक्षमीकरणाचा पाया त्यांनी रोवला असल्याचे त्यांनी सांगितले.


आयुक्त यशवंत डांगे यांनी रूढी परंपरेने बरबटलेल्या समाजाला महापुरुषांनी दिशा देण्याचे कार्य केले. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी करुन समाजाला प्रकाशवाट दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्या समतेच्या विचारांचा जागर त्यांनी केल्याचे सांगितले. तर महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचारांचा अंगीकार करुन समाजाच्या प्रगतीसाठी पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *