• Thu. Jan 22nd, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

ByMirror

Nov 28, 2024

महात्मा फुले यांच्या विचाराने मानसिक गुलामगिरीतून मुक्तता मिळाली -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महात्मा फुले यांच्या 134 व्या स्मृतीदिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, संतोष हजारे, सर्वेश सपकाळ, रतन मेहत्रे, सचिन पेंढुरकर, देवेंद्र जाधव, महेश गोंडाळ, किशोर भगवाने, दीपक मेहतानी, जैद सय्यद, अशोक भगावाने आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, महात्मा फुले यांचे तत्त्व व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यास समाजाचा खरा विकास साधला जाणार आहे. त्यांच्या विचाराने शेवटच्या घटकांना दिशा मिळणार असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविल्यास त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे समाजाचा विकास साधला गेला व मानसिक गुलामगिरीतून मुक्तता मिळाली. महात्मा फुले यांनी समाजाच्या उध्दारासाठी शिक्षणाचा मंत्र देवून समतेची रुजवण केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *