जय हिंद फाउंडेशन व कोल्हारचा राजा गणपती मंडळाचा उपक्रम
डोंगरमाथ्यावरील मंदिर परिसर हिरवाईने नटणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कोल्हार (ता. पाथर्डी) येथील गर्भगिरी पर्वतावर असलेल्या प्राचीन खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गावातील कोल्हारचा राजा गणपती मंडळ (विठ्ठल नगर) यांच्यासह या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.
यावेळी मंदिर परिसरात 21 वटवृक्षांची लागवड करण्यात आली. गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मंगलमय वातावरणात तरुणांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाप्रसंगी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, ॲड. पोपट पालवे, ॲड. संदीप जावळे, अशोक गर्जे, रोहिदास पालवे, सचिन पालवे, भाऊ पालवे, दत्तू जावळे, अनिल ससे, कृष्णा काकडे, आजिनाथ पालवे, रामा नेटके, कोल्हारचा राजा विठ्ठल नगर गणेश मित्र मंडळाचे वैभव पालवे, प्रकाश पालवे, आदेश पालवे, श्रीकांत पालवे, निलेश आव्हाड, प्रसाद पालवे, आदित्य पालवे, ऋतुष पालवे, वेदांत पालवे, गणेश पालवे, ऋषीकेश पालवे, शुभम पालवे, कार्तिक पालवे, रोशन पालवे, सूरज पालवे, महेश पालवे, अरुण पालवे, तुषार पालवे, सूरज पालवे आदी उपस्थित होते.
शिवाजी पालवे म्हणाले, गणेशोत्सवात गावागावांत तरुणाई एकत्र येते. या युवा शक्तीला योग्य दिशा दिल्यास सामाजिक परिवर्तन घडवता येते. वृक्षारोपणातून तरुणांमध्ये निसर्गप्रेम जागृत होईल व परिसरात हरितक्रांती घडवण्याचा आमचा हेतू साध्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेश मंडळाचे वैभव पालवे यांनी मंडळाच्या वतीने भविष्यात या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली. गावातील तरुणांना एकत्र आणून पर्यावरणासाठी काम करणे हे आमचे ध्येय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेजर रोहिदास पालवे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, खंडोबाचे मंदिर जवळपास तीनशे वर्षे जुने असून, भाविकांची मोठी वर्दळ येथे असते. डोंगरमाथ्यावर उभ्या असलेल्या या मंदिर परिसराला वृक्षारोपणामुळे नवे सौंदर्य लाभेल. पर्यटन व अध्यात्म या दोन्ही दृष्टिकोनातून हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमासाठी गावातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आभार मेजर सचिन पालवे यांनी मानले.