• Wed. Oct 15th, 2025

शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त संजना चेमटे यांचा सामाजिक विचार मंचतर्फे सन्मान

ByMirror

Sep 28, 2025

संजना चेमटे यांच्यासारखे शिक्षकच समाजात खरी क्रांती घडवतात -गणेश ढोबळे


पुरस्काराची रक्कम गरजू मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा संकल्प

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंतनगर (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका संजना भगवंत चेमटे यांना शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहू, फुले, आंबेडकर, साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.


सामाजिक विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष गणेश ढोबळे यांच्या हस्ते संजना चेमटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षक योगेश सूर्यवंशी, शिक्षिका मीनाक्षी टकले, शहराध्यक्ष युनूस पठाण, सुरज ढोबळे, आरती सकट, प्रदेश कार्याध्यक्ष सुनील सकट, अरहान पठाण, निलेश दुरुळे आदी मान्यवर उपस्थित होते.


शिक्षिका संजना चेमटे यांनी शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम बँकेत ठेव ठेवली असून, त्यातून मिळणारे व्याज गरजू मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. त्यांच्या या सामाजिक दृष्टिकोनाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.


गणेश ढोबळे म्हणाले की, आजच्या काळात शिक्षण हे फक्त ज्ञानदानापुरते मर्यादित राहिलेले नाही. समाजपरिवर्तन आणि मुलांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. संजना चेमटे यांच्यासारख्या उपक्रमशील शिक्षिका या बदलासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यांनी केवळ अध्यापन केले नाही, तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले. शाळेतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक जबाबदारी म्हणून पुरस्काराची रक्कम गरजू मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा निर्णय हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *