अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडव्या पर्यंत दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सोने पे सोना फ्री ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. गुढीपाडव्या पर्यंत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, नगरकरांना याचा लाभ घेण्याचे आवाहन नवनाथभाऊ दहिवाळ व सचिन दहिवाळ यांनी केले आहे.
दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचे नवनागापूर (रेणुका स्कूल जवळ), पाईपलाईन रोड (यशोदा नगर कमानी समोर) येथे दालन आहे. यामध्ये ग्राहकांना सोने पे सोना फ्री या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर नवीन मासिक बचत योजना गुढीपाडव्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांनी आवडीच्या दागिन्याचे आजच्या बाजार भावाप्रमाणे बिल करुन सहा महिन्याचे मासिक हप्ते करुन दिले जाणार आहे. सहा महिन्याचे हप्त्यांची फेड करुन तो दागिना ग्राहकांना बुकिंग केलेल्या भावाप्रमाणे मिळणार आहे.
तसेच इतर विविध योजना कार्यान्वीत असून, विविध सण-उत्सव काळात खरेदीवर विविध ऑफर ठेवण्यात येते. दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सर्व प्रकारचे आकर्षक डिजाईनचे सोन्याचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरी, सर्व स्टोन ज्वेलरी, राशीचे खडे, हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत. दागिन्यांच्या घडणवळणीवर सर्वात कमी मजुरी असलेले हे दालन असून, सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणे बिगर घटीचे दागिने मिळणार असल्याचे दहिवाळ यांनी सांगितले आहे.
