थरारक सामन्यांनी वेधले लक्ष; मुलींच्या 6 संघांचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षा खालील मुलींच्या सामन्यांना गुरुवार (दि.26 सप्टेंबर) पासून प्रारंभ झाले. मुलींच्या उत्कृष्ट खेळाने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला होता. मुलींच्या 6 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, हे सामने लीग पध्दतीने खेळविण्यात येत आहे.
गुरुवारी 17 वर्षा खालील (मुली) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूलचा उत्कृष्ट सामना रंगला होता. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने एकमेकांवर आक्रमक खेळी करुन देखील कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. 0-0 गोल ने हा सामना अनिर्णित राहिला.

आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द कर्नल परब स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटीलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करुन तब्बल 9 गोल केले. वेदिका ससे हिने तब्बल 5 गोल केले. निलम पवार 2 व आलिया सय्यद व स्वप्नाली शेळके हिने प्रत्येकी 1 गोल केला. कर्नल परब स्कूलला या सामन्यात एकही गोल करता आला नाही. यामध्ये 9-0 गोलने आठरे पाटीलचा संघ विजयी झाला.

14 वर्ष वगोगटात (मुले) सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुध्द प्रियदर्शनी पब्लिक स्कूल मध्ये सामना झाला. यामध्ये सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट कडून मिहीर गुंदेचा 2, सौरभ खंडेलवाल व जोएल साठे याने प्रत्येकी 1 गोल केला. 4-0 गोलने सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटचा संघ विजयी झाला.

ऊर्जा गुरुकुल विरुध्द डॉन बॉस्को यांच्यात रंगलेल्या सामन्यात ऊर्जा गुरुकुलने दमदार खेळी करुन 6 गोल केले. प्रतिस्पर्धी संघाकडून एकही गोल झाला नाही. 6-0 गोलने ऊर्जा गुरुकुलने दणदणीत विजय संपादन केले. यामध्ये प्रज्वल व गावित याने प्रत्येकी 2 आणि समर्थ व तन्मय याने प्रत्येकी 1 गोल केला.
16 वर्ष वयोगटात (मुले) आठरे पाटील स्कूल विरुध्द डॉन बॉस्कोच्या सामन्यात आठरे पाटील स्कूलने एकामागोमाग 6 गोल केले. डॉन बॉस्को कडून रेहान तांबोळी याने 1 गोल केला. तर आठरे पाटील कडून भानू चांद 3, कृष्णा टेमकर 2, यश गायकवाड 1 गोल केला. 6-1 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी झाला.