मावळा प्रतिष्ठान व अखंड रामवाडीचा मंडळाचा उपक्रम
नवरात्र महिलांचा मान-सन्मान वाढविणारा व स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव -सौ. शितलताई जगताप
नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी येथील लाडक्या बहिणींना शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त साड्यांची भेट देण्यात आली. मावळा प्रतिष्ठान व अखंड रामवाडीच्या वतीने नगरसेविका शितलताई जगताप यांच्या हस्ते साड्यांचे वितरण करण्यात आले. प्रारंभी सौ. जगताप यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
यावेळी सौ.पूजा गोंडाळ, सचिन जगताप, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील, पिटु गोधडे, राष्ट्रवादी पार्टीचे भिंगार शहर संघटक अक्षय पाथरीया, नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष पै. अश्विन खुडे, लक्ष्मीआई यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे, सागर साठे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे सतीश साळवे, सुरेश वैरागर, दिपक साबळे, नितीन बोरगे, किशोर उल्हारे, अक्षय उमाप, सचिन उमाप, सुभाष वाघमारे, सागर देठे, गणेश लबडे, दिपक लोखंडे, राजू कांबळे,अजय केंजरला,अमोल शेरकर,नंदन शेरकर आदी सह मावळा प्रतिष्ठाण व अखंड रामवाडी चे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
शितल जगताप म्हणाल्या की, नवरात्र उत्सव महिलांचा मान-सन्मान वाढविणारा व स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव आहे. या उत्सवानिमित्त देवीची भक्ती केली जाते. प्रत्येक समाजाने महिलेचा सन्मान राखल्यास रामराज्य अवतरणार आहे. महिलांसाठी रामवाडीत घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
निलेश म्हसे पाटील म्हणाले की, वंचितांच्या आनंदात खरा आनंद असून, रामवाडी भागातील नवरात्रीनिमित्ताने खडतर उपवास करणाऱ्या महिलांचा नवरात्र उत्सव गोड करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणींना साडी वाटप करण्यात आले. आमदार जगताप हे सदैव महिलांच्या सन्मानार्थ भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी रामवाडी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
