प्रजासत्ताक दिवस भारतीय लोकशाहीचा गौरव दिवस -न्यायाधीश एस.एन. भालेराव
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे. देशाच्या कारभारासंबंधीचे तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केले आहे ते भारतीय संविधान आहे. ज्या दिवशी ते अमलात आले, तो प्रजासत्ताक दिवस भारतीय लोकशाहीचा गौरव दिवस असल्याचे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश एस.एन. भालेराव यांनी केले.
शहरातील जिल्हा कौटुंबिक न्यायालयात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात न्यायाधीश भालेराव बोलत होत्या. यावेळी याप्रसंगी सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. लखोटे, कामगार न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत देशमुख, न्यायाधीश सुधाकर सोनवणे, शरद देशपांडे, चतुर साहेब, एस.वी. तोडकर, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. अनिता दिघे, ॲड. लक्ष्मण कचरे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. सुमतीलाल बलदोटा, ॲड. महेश शिंदे, ॲड. सुनील तोडकर, समुपदेशक राठोड मॅडम, सुहास सोनवणे आदी उपस्थित होते.
पुढे न्यायाधीश भालेराव म्हणाल्या की, 26 जानेवारी 1950 रोजी संविधान सर्वांसाठी लागू करण्यात आले. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, आयुष्यमान करते गुणवंत लोकशाही, सुटलाच तोल तर आमचा सावधान करते!, असे उद्गार त्यांनी काढले.
जुने जिल्हा न्यायालय परिसरात झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या प्रारंभी न्यायमूर्ती रामकृष्ण प्रभुणे यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर न्यायाधीश भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जय युवा अकॅडमी, आधारवड बहुउद्देशीय संस्था, उडाण फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व उपस्थित न्यायाधीशांना भारतीय संविधानाच्या पुस्तकांची प्रति भेट देण्यात आल्या.
न्यायाधीश शरद देशपांडे यांनी केलेली चित्रकला, छायाचित्र व निसर्गचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन न्यायाधीश भालेराव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड.राजेश कावरे, ॲड टकले, ॲड. अनुराधा येवले, रजनीताई ताठे, ॲड. हरीश टेमकर. ॲड. करुणा शिंदे, ॲड. सुजाता पंडित, आरती शिंदे, नलिनी गायकवाड, ॲड. कुलकर्णी आदींसह कौटुंबिक न्यायालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिता दिघे यांनी केले. आभार सुहास सोनवणे यांनी मानले.