महिलांनी केला आदिशक्तीचा जागर
पारंपारिक वाद्यांचा गजर
अहमदनगर (प्रतिनिधी)- भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहराच्या वंजार गल्लीतील रायगड तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. परिसरातील सर्व महिला व युवती वर्गाने या उत्सव सोहळ्यात सहभाग नोंदवून आदिशक्तीचा जागर केला. डोक्यावर फेटे परिधान करुन कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी लक्ष वेधले.

तुळजा भवानी मातेच्या जय घोष करुन पारंपारिक वाद्यांचा यावेळी गजर करण्यात आला. विधीवत घटस्थापना करुन नगरसेविका अश्विनी सचिन जाधव यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
नवरात्रीच्या प्रारंभी पारंपारिक ढोल पथकाच्या निनादात रंगलेल्या सोहळ्याप्रसंगी कांचन रामनानी, रंजना दरक, कल्पना शिंगटे, रोहिणी शिंगटे, मनीषा शिंगटे, सुवर्णा साळुंखे, ललिता साळुंखे, पायल मुंडलिक, मोक्षदा जाधव, आशा थोरात, शिल्पा जाधव, वृषाली थोरात, कविता धुपधरे, निर्मला धुपधरे, उषा शिंगटे, कांता गवळी, वनिता देशमुख, राजश्री गवळी, अंबिका गवळी, सुरेखा गवळी, जिया रामनानी, अमृता क्षीरसागर, श्रुती साळुंखे, सानिका शिंगटे, रिंकू शिंगटे, बेबीताई थोरात, संगिता ससे, वैष्णवी डहाळे, मधुबाला जोशी, सुरेखा शेटे, भारती गवळी, सुनिता दळवी, जया राऊत, जयश्री गवळी, कल्पना गवळी, वैशाली गवळी, पुष्पा शेटे, मीना थोरात, ऋतिका थोरात, विद्या थोरात, सुभद्रा मंडलिक, लता साळुंखे, लक्ष्मी साळुंखे आदींसह रायगड तरुण मंडळ ट्रस्ट नवरात्र महीला महोत्सव समितीच्या सदस्या उपस्थित होत्या.

रायगड तरुण मंडळाच्या वतीने महिलांसाठी नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध उपक्रमासह स्पर्धा देखील घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी दिली.
