• Thu. Jan 1st, 2026

गरजू मुलींच्या शिक्षणासाठी घर घर लंगर सेवा, लायन्स व लिओ क्लबचा पुढाकार

ByMirror

May 26, 2024

शहरातील गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक किटचे होणार वाटप

नगरकरांना सामाजिक कार्यास हातभार लावण्याचे आवाहन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात गरजूंची भुक भागविणाऱ्या व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीने यावर्षी गरजू मुलींना शैक्षणिक साहित्याची मदत केली जाणार आहे. जून मध्ये शाळा सुरु झाल्यावर शहरातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याची किट दिली जाणार असून, या सामाजिक कार्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


परिस्थिती अभावी मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे काम या उपक्रमाद्वारे केले जाणार आहे. कोरोना काळातही गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन, लॅपटॉप, शैक्षणिक साहित्य व पेन ड्राईव्हचे वाटप करण्यात आले होते. तर झोपडपट्टीत जाऊन गरजू विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. मागील वर्षी देखील 111 मुलींना सायकल वाटप करून सुमारे 17 शाळेत सायकल बँक स्थापना करण्यात आली.


यावर्षी देखील घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सहावी, सातवी व आठवीच्या मुलींना शालेय बॅग, वह्यांचे सेट आणि कंपास अशा प्रकारे शैक्षणिक साहित्याची किट वाटण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


मुली या शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असून, आपले कर्तृत्व सिध्द करत आहे. परंतु अजून देखील अनेक मुलींना जी मदत पाहिजे ती प्राप्त होत नाही. मुलगी आहे म्हणून तिला दुय्यम लेखले जाते, मोठ्या भाऊची व्हया जुनी पुस्तके देण्यात येतात. ग्रामीण भागात घरची परिस्थिती बिकट असताना मुलींना शाळेतून काढण्यात येते. अशा परिस्थिती मधील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांना शैक्षणिक सात्याचे किट वाटप केले जाणार आहे. मुलींना वाटप केले जाणाऱ्या शैक्षणिक साहित्य असलेल्या एका किटची किंमत 330 रुपये असून, यात सर्व नगरकर हातभर लावून मुलींच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे हरजीतसिंह वधवा व प्रितपालसिंह धुप्पड यांनी स्पष्ट केले आहे.


सहकार्यासाठी गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित तारकपूर येथील घर घर लंगर सेवा अन्नछत्रालय येथे सायंकाळी 6 ते 8 येथे भेट देऊन अथवा 9423162727 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जनक आहुजा, प्रशांत मुनोत, लायन्सचे अध्यक्ष धनंजय भंडारे, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, राहुल बजाज, दिलीप कुलकर्णी, सोमनाथ चिंतामणी, राजू जग्गी, राजा नारंग, सिमर वधवा, मुन्नाशेठ जग्गी, कैलाश नवलानी, जस्मीतसिंह वधवा, सुनील छाजेड, राजेश कुकरेजा, जय रांगलानी, विपुल शाह, डॉ. संजय असनानी, दामोदर बठेजा, प्रमोद पंतम, दलजीतसिंह वधवा, सनी वधवा, जतिन आहुजा, किशोर मुनोत, संदेश रपारिया प्रयत्नशील आहेत.


ऑनलाईन मदत करण्यासाठी 9423162727 या नंबरवर गुगल पे किंवा गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान, ॲक्सिस बँक, खाते नंबर 215010100014580, आयएफएससी कोड- UTIB0000215 या मध्ये आर्थिक मदत पाठविण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *