अ श्रेणीत तब्बल 5 तर ब श्रेणीत 10 विद्यार्थी चमकले
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय रेखाकला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) गीत ड्रॉइंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एलिमेंटरी व इंटरमिजीएट मध्ये अ श्रेणीत तब्बल 5 विद्यार्थी तर ब श्रेणीत 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शासकीय चित्रकला परीक्षा 2023 चा नुकताच निकाल लागला असून, यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गीत ड्रॉइंग क्लासच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेच्या वनिता चौधरी, मराठी सोयरीक संस्थेचे अशोक कुटे, शिशु संगोपन संस्थेतील शिक्षिका उमादेवी राऊत, रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यामंदिरच्या (टाकळी ढोकेश्वर) ज्योति ठुबे, गीत ड्रॉइंग क्लासेसच्या संचालिका गीतांजली लाहोर, रोहित लाहोर आदी उपस्थित होते.
गीतांजली लाहोर म्हणाल्या की, इलेमेंटरी व इंटरमिजिएटसाठी सोप्या पद्धतीने मुलांना चित्रकलेचे धडे दिले जात आहे. चित्रकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाने चांगले यश मिळत आहे, ज्यांना चित्र काढता येत नाही, अशा मुलांना देखील सोप्या पद्धतीने चित्रकला शिकवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित पाहुण्यांनी गीत ड्रॉइंग क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले.
इंटरमिजिएट परीक्षेत अ मिळवल्याबद्दल मयूर कांबळे, अनुज दुलम, चिनार ठुबे, ब श्रेणीतील तन्मय पाडळे, लाभेश ओस्तवाल, श्लोक ढोरजे, अनुष्का बल्लाळ तसेच एलिमेंटरी परीक्षेत अ श्रेणीत उत्तीर्ण झालेले निकिता लोटके, धून भट आणि ब श्रेणीतील श्रावणी राऊत, शताक्षी नगरकर, राजलक्ष्मी संभार, पृथ्वीराज छिंदम, विराज ओस्तवाल, रक्षिता अडेप,जयदीप बाबर,मृणाल पंतम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.