शाळेच्या वतीने गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील गौरी कांतीलाल दळवी हिने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडलेल्या 16 ते18 किलो वजन गटातील राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा 2025-26 मध्ये गौरीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन द्वितीय क्रमांकाचे रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित पुणे विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. तर राज्य स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा मुख्याध्यापिका छाया काकडे यांनी सत्कार केला. दळवी हिने तायक्वांदो खेळातून शहराचे व शाळेचे नाव राज्यात उंचावले असल्याची भावना काकडे यांनी व्यक्त केली.
गौरी दळवी हिने मिळवलेल्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, माजी सचिव शिवाजीराव भोर, जनरल बॉडी सदस्य अर्जुनराव पोकळे, ज्ञानदेव पांडुळे, अभिषेक कळमकर, शौकत तांबोळी, विभागीय अधिकारी नवनाथजी बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, अंबादास गारुडकर, विश्वासराव काळे, कैलासराव मोहिते तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, मार्गदर्शक तायक्वांदो प्रशिक्षक व क्रीडा विभाग प्रमुख प्रदीप पालवे, संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
