• Tue. Jul 22nd, 2025

केडगाव ग्रामस्थांच्या वतीने गणेश ननावरे यांचा सत्कार

ByMirror

Dec 8, 2023

भाजप ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा सन्मान

ननावरे यांचे केडगावमध्ये उत्तमप्रकारे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य सुरु -सचिनशेठ कोतकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे यांचा केडगाव ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक सचिनशेठ कोतकर यांनी सत्कार केला. यावेळी नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका लताताई शेळके, नगरसेविका गौरीताई ननावरे, जालिंदर कोतकर, प्रसादजी आंधळे, गणेश आनंदकर, महेश गुंड, निलेश सातपुते, भुषण गुंड, सोनू घेंबुड, नरेंद्र दगड, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते.


सचिनशेठ कोतकर म्हणाले की, गणेश ननावरे यांचे केडगावमध्ये उत्तमप्रकारे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य सुरु आहे. पक्षात एकनिष्ठपणे केलेल्या कार्यामुळे त्यांना केडगावची जबाबदारी टाकण्यात आली असून, ते ही जबाबदारी उत्तमपणे पेलवून कार्य करणार असल्याची अपेक्षा व्यक्त करुन, त्यांना पुढील राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नगरसेवक राहुल कांबळे व नगरसेविका लताताई शेळके यांनी ननावरे यांना मिळालेले पद हे त्यांनी पक्षात केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती असून, त्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.


सत्काराला उत्तर देताना गणेश ननावरे यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भाजपच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य केले. पक्षाने दिलेली जबाबदारी उत्तमपणे पेलवून केडगावमध्ये पक्षाचे संघटन केले जाणार आहे. पक्षाचा विचार व विकासात्मक अजेंडा सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *