अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर ननावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी ननावरे यांची नियुक्ती जाहीर केली.
गणेश ननावरे हे भाजपचे एकनिष्ठ सक्रिय कार्यकर्ते असून, अनेक वर्षापासून पक्षाच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत आहे. केडगाव मधील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा पुढाकार राहिला आहे. या भागात त्यांचा असलेला जनसंपर्क, उत्तम संघटनात्मक कार्य व पक्षासाठी कार्य करण्याची त्यांची तळमळ पाहून त्यांची केडगाव मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे ध्येय-धोरण घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्ष वाढीसाठी सर्वपरीने प्रयत्न करणार असल्याची भावना ननावरे यांनी व्यक्त केली आहे. या नियुक्तीबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, महेंद्र (भैय्या) गंधे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.