नवरात्र उत्सवाचा सामाजिक उपक्रम; पंचक्रोशीतील महिलांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अयोग्य आहार पध्दती व व्यायामाचा अभाव गंभीर आजारांना कारणीभूत -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या महिलांसाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिर पार पडले. नवरात्र उत्सवानिमित्त अहमदनगर होमिऑपॅथिक मेडिकल कॉलेज (हॉस्पिटल), निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. कैलाससिंग परदेशी, ग्रामविकास अधिकारी, गोवर्धन राठोड, डॉ. महेश डोके, सागर जगताप, संदिप खैरे, निमगाव वाघा आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. शिवानी कुलकर्णी, प्रकाश गायकवाड, गणेश येणारे, संगीता आतकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदींसह ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये अनेक दुर्धर आजार जडत आहे. कुटुंबाचा सर्व कारभार पाहताना महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसते. अयोग्य आहार पध्दती व व्यायामाचा अभाव गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहे. या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी होमिऑपॅथिक औषधोपचार पध्दती सर्वोत्तम ठरत असून, अनेक दुर्धर आजार कायमचे बरे होतात. आजाराने ग्रासलेल्या महिला वर्गांला व्याधीमुक्त करण्यासाठी शिबिर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. कैलाससिंग परदेशी यांनी जुनाट व दुर्धर व्याधींनी बहुतांशी लोक ग्रासलेले असून, अनेक वर्षांपासून उपचार घेऊनही फायदा होत नाही. होमिओपॅथी ही एक सक्षम व शास्त्रोक्त औषधप्रणालीद्वारे अशा रुग्णांना जुनाट व्याधीतून कायमस्वरूपी बरे करता येणे शक्य असल्याची माहिती दिली.
या शिबिरात दुर्धर आजारांनी ग्रासलेल्यां रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार देण्यात आले. या शिबिरांतर्गत रुग्णांना मोफत औषधोपचार करून त्यांना पुढील औषधोपचारासाठीही योग्य मार्गदर्शनाची हमी शिबिराद्वारे देण्यात आली.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी………………
