• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालकांची मोफत आरोग्य तपासणी; 55 बालकांची मोफत तपासणी

ByMirror

Jun 27, 2026
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालकांची मोफत आरोग्य तपासणी; 55 बालकांची मोफत तपासणी

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या एनआयसीयू विभागात नवजात बालकांसाठी सर्व अद्यावत सेवा उपलब्ध -डॉ. निखिलकुमार गुट्टे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लहान बालकांच्या आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत एनआयसीयू सेंटर कार्यान्वीत असून, तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम सेवा देत आहे. 26 बेडच्या अद्यावत एनआयसीयू विभागात नवजात बाळाच्या विविध आजारावर सर्व अद्यावत सेवा उपलब्ध असून, हे सेंटर जिल्ह्यातील बालकांसाठी संजीवनी ठरत असल्याचे प्रतिपादन नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ डॉ. निखिलकुमार गुट्टे यांनी केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत बालरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. गुट्टे बोलत होते. यावेळी संतोष बोथरा, डॉ. वसंत कटारिया, डॉ. प्रकाश कांकरिया, बाबुशेठ लोढा, अभय गुगळे, माणकशेठ कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी, डॉ. आशिष भंडारी, पेडियाट्रीक सर्जन डॉ. रूपेश सिकची, बालरोग तज्ज्ञ डॉ. वैभवी वंजारे, डॉ. दिपी अग्रवाल, डॉ. लिझा बलसारा आदी उपस्थित होते.


पुढे डॉ. गुट्टे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये नवजात बाळाच्या श्‍वासोच्छवासाच्या त्रासावर उपचार, बालदमा ए.आर.डी.एस. (श्‍वसनदाह), नवजात बालकांच्या कावीळीसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा, अनुवंशिक आजार, जन्मजात आजारांचे निदान व उपचार, बालदमा तसेच लहान मुलांचे टू डी इको, एक्स रे, पॅथोलॉजी लॅब व डायलिसिस मशीन द्वारे सेवा उपलब्ध आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.


बालरोग तज्ञ डॉ. वैभवी वंजारे म्हणाल्या की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये तज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून नवजात बालकांपासून लहान मुलांच्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी केल्या जात आहे. प्रदीर्घ अनुभवी डॉक्टर पूर्णवेळ हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जात असून, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत लाभ देखील लाभार्थींना दिला जात आहे. तसेच नवजात बालकांना शासकीय लसीकरण व्यतिरिक्त इतर महाग असलेले लसीकरण अल्पदरात ना नफा, ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दिपी अग्रवाल यांनी देखील हॉस्पिटल मधील विविध अद्यावत सोयी-सुविधांची यावेळी माहिती दिली.


प्रास्ताविकात डॉ. आशिष भंडारी यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. या शिबिरात 55 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबीरातील गरजू बालकांवर सवलतीच्या दरात सरकमसीजन (सुंता), हायड्रोसिल, ॲपेंडिक्स, जांघेचा हर्निया, बेंबीचा हर्निया या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *