युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम
झोपडपट्टी भागातील मुलांची होणार मोफत दंत तपासणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालेल्या दंत रोगाच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टी भागातील मुलांची मोफत दंत तपासणी शिबिराचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत सिध्दार्थनगर येथील विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. तर मौखिक आरोग्याबद्दल विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सिध्दार्थनगर येथील स्नेहालयाच्या बालभवनमध्ये झालेल्या शिबिराप्रसंगी केंद्र समन्वयक विना वड्डेपल्ली, शिक्षक प्रदीप भोसले, वैशाली नेटके, मनिषा चकाले, छाया जगधने उपस्थित होते.
या शिबिराला परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये डॉ. सावन पालवे व डॉ. सायली शिंदे यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करुन दातांची योग्य निगा राखणे, दंत विकार सुरु झाल्यावर वेळोवेळी डॉक्टरांकडे करावयाचे उपचार व दातांच्या आरोग्यासाठी काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
