• Tue. Jul 8th, 2025

अस्थिव्यंग व्यक्तीसाठी मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन

ByMirror

Jul 6, 2025

शिबिराचा लाभ घेण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर व एस.आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप योजनांतर्गत जिल्ह्यातील तालुका निहाय अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप शिबिराचे आयोजन दि. 7 ते 21 जुलै या कालावधीपर्यत सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात आले आहे.


या शिबिरामुळे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स तयार करून घेण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. या शिबिरासाठी येतानी आधार कार्ड, वैश्‍विक कार्ड (यूडीआयडी), रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला (तलाठी/तहसीलदार/खासदार/आमदार) याची सत्यप्रत तसेच छायांकित प्रत घेऊन येणे गरजेचे आहे. शिबिरास येतांना मदतनीस किंवा नातेवाईक सोबत घेऊन येण्याचे म्हंटले आहे.


ही शिबिरे पुढीलप्रमाणे सकाळी 10 ते 5 या वेळात होणार आहेत. अहिल्यानगर शहर दि. 7 जुलै जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विळदघाट अहिल्यानगर, दि. 8 जुलै उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, दि. 9 जुलै जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय, टिळक रोड, अहिल्यानगर, दि. 10 जुलै नुतन कन्या विद्यालय, राहुरी, दि. 11 जुलै मूकबधिर विद्यालय, गायत्री मंदिराजवळ, अशोक थिएटर समोर, बेलापूर रोड, श्रीरामपूर, दि. 12 जुलै आनंद लॉन्स मंगल कार्यालय, पारनेर बाजार समिती रोड, पारनेर, दि. 13 जुलै ग्रामीण आरोग्य केंद्र, घुलेवाडी, संगमेनर, दि. 14 जुलै महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट साईबाबा तपोभूमी प्रदर्शन हॉल, कोपरगाव, दि. 15 जुलै साई विठ्ठला लॉन्स, चितळी रोड, राहता, दि. 16 जुलै ग्रामीण रुग्णालय, शेवगाव, दि. 17 जुलै ग्रामीण रुग्णालय, नेवासा, दि. 18 जुलै रत्नकमल मंगल कार्यालय, श्रीगोंदा पंचायत समिती शेजारी, श्रीगोंदा, दि. 19 जुलै जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामखेड मुले, दि. 20 जुलै सर्वोदय कॉम्प्लेक्स, ग्रामीण आरोग्य केंद्राशेजारी कोल्हार घोटी रोड, अकोले, दि. 21 जुलै श्री साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कूल, विमानतळ रोड, श्री कृष्ण नगर शिर्डी.


जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व शिबिरे होणार आहे. जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजित दिवटे, प्रकल्प समन्वयक डॉ. दिपक अनाप, डॉ. अभिजित मेरेकर, सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *