तथागत बुध्दिस्ट सोसयटीचा उपक्रम
प्रतिकूल परिस्थितीने न डगमगता जद्दीने जीवनातील ध्येय गाठा -ॲड. संतोष गायकवाड
अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने हात धुण्यासाठी वॉश बेसीन बसविण्याचे काम तथागत बुध्दिस्ट सोसयटी इंडियाच्या वतीने मार्गी लावण्यात आले. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य, शिक्षण व सर्वांगीन विकासासाठी तथागत बुध्दिस्ट सोसयटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, नुकतेच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याप्रती जागृती करुन हा उपक्रम राबविण्यात आला.
ॲड. संतोष गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी तथागत बुध्दिस्ट सोसयटीचे संस्थापक अध्यक्ष संजय कांबळे, संध्याताई मेढे, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, शेखर पंचमुख, किशोर जेजुरकर, डॉ. विश्वास गायकवाड, अविनाश भोसले, अश्पाक शेख, अमोल गायकवाड, हर्षल कांबळे, डॉ. हमीद बेग, जीवन कांबळे, सुनील जाधव, गोपी शिंदे, आकाश परदेशी, सिद्धांत कांबळे, अर्जुन अरुण, दीपक गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक विजय घिगे, सहशिक्षिका भारती कवडे, मनीषा शिंदे, मनीषा गिरमकर, दिपाली नवले, वर्षा गायकवाड, खान मॅडम, विठ्ठल आठरे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. संतोष गायकवाड म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीने न डगमगता जीवनातील ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्दीने प्रयत्न करावे. आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकता. शिक्षणाने परिस्थिती बदलणार असून, उच्च शिक्षित होऊन समाजाला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
संजय कांबळे म्हणाले की, साथीचे आजार टाळण्यासाठी तथागत बुध्दिस्ट सोसयटीच्या माध्यमातून या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने संस्थेने वॉश बेसीन उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी हात स्वच्छ धुण्याची सवय लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक विजय घिगे यांनी मनपाच्या शाळेतील सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले. उपस्थितांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
