राजवाड्याची कमान व रंगेबिरंगी कारंजा ठरतोय लक्षवेधी
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईने एमआयडीसीचा परिसर लखलखाटला आहे. मंदिराला जाण्यासाठी भव्य राजवाड्याच्या प्रतिकृती असलेली कमान उभारण्यात आली आले. त्या राजवाड्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती व रंगेबिरंगी कारंजे भाविकांचे लक्ष वेधत आहे.
मंदिराकडे जाणारा रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाईचा झगमगाट करण्यात आला आहे. मंदिरा समोरील मैदान विविध पाळणे थाटले असून, भाविकांसह बालगोपाळ या पाळण्याचा आनंद घेत आहे. तर विविधे खाद्य पदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळण्यांचे व महिलांच्या विविध साहित्यांचे स्टॉलने परिसर गजबजला आहे.

मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, सचिव दत्तात्रय विटेकर, विश्वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व धार्मिक उपक्रम सुरु आहेत.
