• Sat. Mar 15th, 2025

सत्ताधारी पाच संचालकांसह एका पदाधिकाऱ्याचे स्वाभिमानी परिवर्तन मंडळात प्रवेश

ByMirror

Mar 15, 2025

पुरोगामीला ठोकला रामराम

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत आली आनखी रंगत

नगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारी निश्‍चित होवून रंगत आली असताना, सत्ताधारी पुरोगामी मंडळाच्या पाच विद्यमान संचालकांसह एका पदाधिकाऱ्याने स्वाभिमानी परिवर्तन मंडळात प्रवेश केला. सर्व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या रुपाने मोट बांधली असताना, नाराज संचालक व पदाधिकारी त्यांच्याकडे आल्याने ही निवडणुक आनखी चुरशीची होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे.


विद्यमान संचालक सुरेश मिसाळ, प्रा. बाळासाहेब सोनवणे, माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सत्यवान थोरे, माजी व्हाईस चेअरमन ज्ञानेश्‍वर काळे, कल्याण ठोंबरे, पुरोगामी सहकार मंडळाचे कार्यकारणी सदस्य सूर्यभान दहिफळे यांनी स्वाभिमानी परिवर्तन मंडळात प्रवेश केला. त्यांचे सत्कार करुन स्वागत करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र लांडे, विद्यमान संचालक आप्पासाहेब शिंदे, उमेदवार राजेंद्र कोतकर, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे, उमेदवार सुरज घाटविसावे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर, मकरंद हिंगे, राहुल गोरे, प्रसाद सामलेटी, स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर मंडळाचे अध्यक्ष दत्ता पाटील नारळे, कार्याध्यक्ष सुनील पंडित, सचिव रमजान हवलदार, खजिनदार शिरीष टेकाडे, नंदकुमार शितोळे आदी उपस्थित होते.


आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून सर्वांना सन्मानाची वागणूक देऊन, मानसन्मान जपला जात आहे. सर्व संघटना व नेत्यांना बरोबर घेऊन सविचाराने पुढे जात आहे. सत्ता आल्यास सभासदांच्या ठेवीवर अधिक व्याजदर आणि कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्याचा संकल्प राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


राजेंद्र लांडे म्हणाले की, परिवर्तन अटळ आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता विद्यमान संचालक, माजी व्हाईस चेअरमन यांनी स्वाभिमानी परिवर्तन मंडळात प्रवेश केला. सत्ताधाऱ्यांचा डोळारा कोसळला असून, नवीन सहकाऱ्यांच्या पाठबळाने आणि सर्वांचे एकजुटीने विजय निश्‍चित असल्याची अपेक्षा व्यक्त केली.


सुरेश मिसाळ यांनी पुरोगामी मंडळाने सत्ताधारी 17 संचालक असताना त्यापैकी 16 संचालकांची उमेदवारी नाकारण्यात आली. नवीन संचालक घेऊन यायचे आणि त्यांना कारभार समजूस तर 5 वर्षे निघून जातात. आयात केलेले उमेदवार आणण्यात आले असून, व्यक्ती केंद्र सत्ता ताब्यात ठेवण्याचा खटाटोप सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण ठोंबरे यांनी एक निष्ठेने काम केल्याची परतफेड अशा पद्धतीने झाली आहे. उमेदवारी नाकारुन चुकीची वागणूक दिली गेली. सेवानिवृत्त असून देखील सत्ता ताब्यात ठेवण्याचा अट्टाहास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *