गणेशोत्सवानिमित्त अश्वरूढ फाउंडेशनचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- अश्वरूढ फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्ञानसाधना गुरुकुलची पूर्वा ढोरसकार हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
अश्वरूढ फाउंडेशनच्या वतीने महानगरातील समस्या व उपायोजना हा शालेय स्तरावर एक नवीन विषय विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेसाठी देण्यात आला होता. ढोरसकार यांनी या विषयावर उत्कृष्टपणे आपले विचार मांडून प्रथम क्रमांक पटकाविला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय गायकवाड म्हणाले की, ज्ञानसाधना गुरुकुलच्या सर्व विद्यार्थ्यांनी या विषयावर आपले चांगले मत लिखाणातून व्यक्त केले. पूर्वा ढोरसकर या मुलीने अतिशय सुरेख मांडणीसह अलंकारिक भाषेचा वापर करून महानगरातील समस्या व त्यावर करावयाचे उपायोजना याची मांडणी उल्लेखनीय असल्याने तिला प्रथम क्रमांक देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ढोरसकार हिला बक्षीस देण्यात आले. यावेळी ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा.प्रसाद जमदाडे, शाहरुख शेख, शबाना शेख, कोमल शिंदे, सुवर्णा दाणी आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
