• Thu. Jul 24th, 2025

ॲलेक्स चषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी

ByMirror

Mar 11, 2024

भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिक्स-ए-साइड ॲलेक्स चषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया-शिवाजीयन्सने बाटा एफसी विरुद्ध टायब्रेकरमध्ये निर्णायक 3-1 ने विजय मिळवला.
सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर दोन दिवसीय फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला होता. विविध संघातील खेळाडूंनी कौशल्यपणाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये बाटा एफसीचे फहीम शेख आणि कामरान पेनल्टी स्पॉटवरून गोल करण्यास अपयशी ठरले, तर केवळ आदित्य भिंगारदिवे गोल करण्यात यशस्वी झाले.


रोशन रिकामे आणि रोनक जाधव यांनी गोल केल्याने फिरोदिया शिवाजीयन्सने दणदणीत विजय मिळवला. तर तिसरी पेनल्टी किक घेण्याची गरज राहिली नाही.
फिरोदिया शिवाजीयन्सचे रोशन रिकामे आणि बाटा एफसीचे रुषी पाटोळे या दोघांना स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत 16 संघांचा सहभाग होता. ॲलेक्स कप आयोजन समितीचे चेअरमन रेव्ह. फादर विश्‍वास परेरा व अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद यांच्या हस्ते विजेता, उपविजेत्या व तृतीय क्रमांकाच्या संघांना पुरस्कार वितरण करण्यात आले.


रेव्ह. फादर पेरेरा यांनी खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक केले. या स्पर्धेतील विजेत्या संघाचे जोगासिंग मिनहास, राणासेठ परमार, नरेंद्र फिरोदिया, मनोज वाळवेकर यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी फर्नांडिस कुटुंबियांचे विशेष योगदान लाभले. रोनप फर्नांडिस, वोहमिया फर्नांडिस, अनिता परेरा यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणी सदस्या पल्लवी सैदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हिअर स्वामी, जॉय जोसेफ, राजेश अँथनी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *