आमदार जगताप यांच्या माध्यमातून भिंगार राष्ट्रवादीने केलेल्या पाठपुराव्याला यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या बेलेश्वर चौक ते डीएसपी चौक रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले असून, भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

भिंगार राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सुरु असलेल्या रस्ता पॅचिंगच्या कामाची पहाणी केली. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवक अध्यक्ष शिवम भंडारी, कार्याध्यक्ष अभिजीत सपकाळ, सरचिटणीस विशाल (अण्णा) बेलपवार, सोशल मीडिया अध्यक्ष मारुती पवार, दीपक लिपाणे, मतीन ठाकरे, सागर चवंडके, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संकेत झोडगे, संजय खताडे, दिनेश लंगोटे, फरीद शेख आदी उपस्थित होते.
बेलेश्वर चौक ते डीएसपी चौक रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात होत होते. डिएसपी चौकातून भिंगारला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी परिषद व लष्करी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या मागणीची दखल घेऊन सदरचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहिती संजय सपकाळ यांनी दिली.
