• Wed. Nov 5th, 2025

मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळण्यासाठी दिव्यांग बांधवांचे मनपाच्या प्रवेशद्वारात उपोषण

ByMirror

Feb 21, 2024

मागील अनेक महिन्यापासून उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने दिव्यांगांवर उपासमारीची वेळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेकडून मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दिव्यांग बांधवांनी उपोषण केले. या उपोषणात ऑल इंडिया ब्लाईन्ड असोशिएशनचे अमित सोनार, सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे, दिव्यांग विकास परिषदेचे असलम पठाण, सरोजिनी गांगुर्डे, अंबादास रासकोंडा, गौरव राठोड, सुधाकर कोंडेकर, आरती जाधव, राजू मचे, बाहुबली वायकर, अशोक सोनवणे, यश व्यवहारे आदींसह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.


महापालिका हद्दीतील 1447 दिव्यांगांना 5 टक्के सेस मधून प्रती महिना उदरनिर्वाह अनुदान देण्यात येते. परंतु मागील अनेेक महिन्यापासून दिव्यांगांना अनुदान न मिळाल्याने दिव्यांग बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दिव्यांगांचा उदरनिर्वाह व औषधोपचाराचा खर्च देखील भागत नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या उपोषणाची दखल घेवून एका महिन्याच्या अनुदानाचा चेक तातडीने काढण्याचे व उर्वरीत थकित अनुदान एप्रिलमध्ये देण्याचे आश्‍वासन उपायुक्त (कर) बांगर यांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.



दिव्यांगांना वेळेवर उदरनिर्वाह अनुदान मिळणे आवश्‍यक आहे. महापालिकेला चालू वर्षात कर भरणा कमी झाल्याने दिव्यांगांना अनुदान देण्यास अडचण येत असल्याचे हास्यास्पद मनपा प्रशासनाने दिले. महापालिका प्रशासन कर वसुली करण्यास कमी पडत असेल, तर त्याचा फटका दिव्यांगांना बसता कामा नये. -बाबासाहेब महापुरे (अध्यक्ष, सावली दिव्यांग संघटना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *