• Wed. Mar 12th, 2025

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने महिला दिनानिमित्त महासोहळ्याचे आयोजन

ByMirror

Mar 7, 2025

व्याख्यान,समुपदेशन पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे आयोजन

हजारो महिला घेणार अष्ट प्रतिज्ञा

नगर (प्रतिनिधी)- अबॅकस, वैदिक गणित व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 42 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व भारतासह 20 देशांत हजारो शाखा असलेल्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही हिरकणी सर करणार कर्तृत्वाचे एव्हरेस्ट! या महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, व्याख्याने, समुपदेशन, पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचा यामध्ये समावेश आहे. अशी माहिती अकॅडमीच्या मार्गदर्शिका कल्पना अशोक घडेकर यांनी दिली आहे.


शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी सावेडीच्या गुलमोहर रोडवरील आम्रपाली गार्डन हॉल येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून रमाकांत काठमोरे (शिक्षण सहसंचालक-प्राथमिक शिक्षण संचालनालय), व्याख्याते प्रा.एन.बी.धुमाळ- यशस्वीतेचा सुवर्णमंत्र, कवी डॉ.अमोल बागुल -आयाबायांच्या कविता, शबाना शेख(वन स्टॉप सेंटर- केंद्र प्रशासक) माझी संस्था माझे कौशल्यावर व्याख्यान, तेजस्विनी आहेर (महिला व बाल समुपदेशिका)- सुदृढ मानसिक आरोग्याद्वारे ध्येयपूर्तीवर व्याख्यान, सौ.कल्पना घडेकर- प्रचलित अबॅकस मधील माझे नवसंशोधन आदी विषयावर व्याख्याने संपन्न होणार असून, अकॅडमीच्या गुणवान शिक्षिकांच्या प्रेरणादायी मुलाखती, अनुभव कथन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


सर्व महिला व मुलींसाठी हक्क, समानता, सक्षमीकरणाला गती दया या महिला दिन-2025 च्या संकल्पनेनुसार हजारो महिला रक्षिता प्रतिज्ञा, महिलांचे हक्क, संविधान रक्षण, हुंडाबंदी, महिलांसाठी सायबर सुरक्षा, फिट इंडिया, व्यसनमुक्ती व अहिंसा याविषयी प्रतिज्ञा घेणार आहेत. तसेच अकॅडमीच्या वतीने संचलित रक्षिता महिला संघ या उपक्रमाच्या माध्यमातून स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी व सहभागासाठी 8888781133 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *