शहर अध्यक्षपदी ऋषिकेश पाडळे तर उपाध्यक्षपदी योहान चाबुकस्वार
रिपाईला सन्मानाची वागणुक देणाऱ्या मित्र पक्षाचे काम केले जाणार -सुशांत म्हस्के
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात प्रवेश केला. ऋषिकेश पाडळे यांची युवक शहर अध्यक्षपदी तर योहान चाबुकस्वार यांची युवक शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पक्षात प्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत करुन नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, अल्पसंख्याक आघाडी शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अमोल खरात, कार्याध्यक्ष अजीम खान, निजाम शेख, नगर तालुका युवक कार्याध्यक्ष रोहित थोरात, जामखेड तालुकाध्यक्ष आदिल शेख, ओबीसी कार्याध्यक्ष विकास पटेकर, युवक कार्याध्यक्ष लकी वाघमारे, आफताब बागवान, अरबाज शेख, हुसेन चौधरी, चिकू गायकवाड, अक्षय लबडे, करण मापारी, रितेश मकासरे, अक्षय खामकर, गौरव जाधव, नागेश दंडवते, स्वप्नील चव्हाण, निखिल ठोकळ आदी उपस्थित होते.

सुशांत म्हस्के म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालत आहे. सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन कार्य सुरु असून, जातीयवादी शक्तीच्या विरोधात पक्ष उभा आहे. जो पक्ष रिपाईला सन्मानाची वागणुक देऊन बरोबर घेऊन त्या मित्र पक्षाचे काम केले जाणार आहे. अन्यथा राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विधानसभा निवडणूक लढवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित पदाधिकारी ऋषिकेश पाडळे व योहान चाबुकस्वार यांनी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करुन शहरात पक्ष वाढविण्याचा संकल्प केला. यावेळी अक्षय ठुबे, सुरज कोलते, शुभम देठे, निखिल जाधव, अजय दुशिंग, तुषार कांबळे, प्रेम वाघमारे, आदेश साठे, आदित्य मेढे, सुमित चव्हाण, सोनल गोरे, अथर्व हिरभगत, प्रणव पवार, स्वप्नील शिंदे, आशिष शिरसाठ, नैतिक पाटोळे, आशु गायकवाड, सोहेल इनामदार, फिरोज शेख, अरबाज शेख, यश नेटके, यश काते, सतीश कांबळे, गणेश कांबळे, हिमेश कांबळे, ज्ञानेश्वर पोटे, अक्षय गुंजाळ, आदेश पाडळे आदी उपस्थित होते.
