बाळगोपालांनी रेखाटला आपल्या मनातील गणेशोत्सव
फक्त राजकारण न करता, समाजकारणातही राष्ट्रवादीचे सातत्याने योगदान -इंजि. केतन क्षीरसागर
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सावेडी येथे चित्रकला स्पर्धा रंगली होती. या चित्रकला स्पर्धेस शहरातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. बाळगोपालांनी कागदावर रंगांची उधळण करीत, आपल्या मनातील गणेशोत्सव रेखाटले.

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुलमोहर रोड, सावेडी येथील त्यांच्या संपर्क कार्यालया समोर राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील गणेशोत्सव या विषयावर चित्र रेखाटले. पाऊस सुरु असतानाही स्प्ार्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह कायम होता.
दिवसभर रंगलेल्या या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संध्याकाळी उशीरा राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर व उद्योजक अमोल गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला राष्ट्रवादीच्या रेश्मा आठरे व जिल्हा मराठा संघ सदस्य कुटे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ओंकार म्हसे, सौरभ पंडित, केतन ढवण, मयूर रोहाकले, गौरव हरबा, मंगेश शिंदे, हृषीकेश जगताप, शिवम कराळे, कृष्णा शेळके, शुभम चितळकर, रोहित सरना, आशुतोष पानमळकर, किरण घुले, साहिल पवार, ओंकार मिसाळ, कुनाल ससाणे, अभिजीत खरात, श्रावण जाधव, पंकज शेंडगे, ओंकार साळवे, मंगेश जोशी, दीपक गोरे, रोहन देशपांडे, शुभम जोशी आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, फक्त राजकारण न करता, समाजकारणातही राष्ट्रवादीचे सातत्याने योगदान सुरु आहे. गणेशोत्सवात राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून पर्यावरण पुरक गणपती बसवून, विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेवून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. विद्यार्थी व युवकांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धेतल मोठा ब गट (11 ते 16 वर्षे) प्रथम- सिद्धी चौधरी, द्वितीय- वैष्णवी किणीकर, तृतीय- उत्कर्ष शेटीया, मोठा क गट (11 ते 16 वर्षे) प्रथम- सौम्या जाधव, द्वितीय- ईशान शिंदे, तृतीय- हार्दिक खुराना, छोटा अ गट (6 ते 10 वर्षे) प्रथम- रुद्रा गुंड, द्वितीय- पुजा ताटी, तृतीय- वेदांत चौधरी, उत्तेजनार्थ – साक्षी शिरसाठ, अर्चना ताटी यांनी बक्षीस पटकाविली.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. तर सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणनंतर पारंपारिक ढोल पथकाचे वादन करण्यात आले. ढोल पथकाचे वादन पाहण्यासाठी युवक-युवतींसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
