141 वाहन विक्रीचा केला विक्रम
बुकिंगला ग्राहकांचा प्रतिसाद
नगर (प्रतिनिधी)- दिवाळी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर ह्युंदाईच्या विविध मॉडेल्स कारला ग्राहकांची प्रथम पसंती मिळाली. शहरातील नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये बुकिंगला व कार खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी तब्बल 141 वाहन विक्रीचा विक्रम नोंदविण्यात आला. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही ग्राहकांनी ह्युंदाईला पसंती दर्शवली.
कुटुंबाच्या सुरक्षित प्रवासासाठी खाजगी वाहनाला पसंती मिळत आहे. ह्युंदाईची नावाजलेली ब्रॅण्ड इमेज विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी विविध दर्जेदार उत्पादने वाहन क्षेत्रातील सर्वोच्च वॉरंटी, कमीत कमी मेंटेनन्स, सुरक्षेसाठी सर्व मॉडेलला सहा एअरबॅग तसेच इलाक्षी ह्युंदाईची विनम्र तत्पर सेवा यामुळे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादबद्दल शोरुमचे संचालक विजयकुमार गडाख यांनी ग्राहकांचे आभार मानले दिवाळी व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या .
ग्राहकांची हुंडाई क्रेटा, अल्काझार, आय ट्वेंटी, वर्णा साठी प्रथम पसंती असून, औरा ॲण्ड नियोसे, एक्स्टरची कमालीची बुकिंग येत आहे. सदरील गाड्यांमध्ये डिझेल, पेट्रोल व सीएनजी वेरंट उपलब्ध असून, डिझेल दीड लिटर व पेट्रोल 1.2 लिटर व दीड लिटर इंजन मध्ये उपलब्ध आहेत. औरा, नियोसे, एक्स्टर मध्ये पेट्रोल व सीएनजी पर्याय उपलब्ध आहेत. द ऑल न्यू क्रेटा व एक्सटर वर्णासाठी प्रचंड प्रतीक्षा यादी असून सुद्धा ग्राहकांची बुकिंग साठी प्रतिसाद वाढत आहे. शोरुममध्ये ग्राहकांसाठी आकर्षक सवलत स्कीम, एक्सचेंजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्यास इलाक्षी ह्युंदाई बांधील असल्याचा विश्वास मॅनेजर राजू बेजगमवर यांनी व्यक्त केला. तसेच प्रथम गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चालक सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी सेवा तसेच अतिरिक्त वॉरंटी, ह्युंदाई ॲपसह ग्राहकांना विविध सुविधांचा लाभ देण्यात आला. आपली नवीन गाडी प्री बुकिंग करण्यासाठी इलाक्षी ह्युंदाईला भेट देण्याचे आवाहन सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी केले आहे. यावेळी शोरूमचे सर्व सेल्समन, कर्मचारी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.