नवीन ट्रांसफार्मर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ
पालकमंत्री व खासदार यांच्या माध्यमातून शहरातील विविध नागरी प्रश्न सोडविण्यात येत आहे -ॲड. अभय आगरकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 15 मधील शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कवडे वस्ती येथील नागरिकांचा विजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी नवीन ट्रांसफार्मर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या हस्ते झाला. जिल्हा वार्षिक विकास योजनेतंर्गत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या पाठपुराव्याने सदर काम मार्गी लावण्यात आले. विजेच्या कमी दाबामुळे अंधारलेली कवडे वस्ती प्रकाशमय होणार आहे.
कवडे वस्ती येथे लोकवस्ती झपाट्याने वाढत असताना वाढलेली विजेची मागणी व कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होते. नागरिकांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन ट्रांसफार्मर बसविण्याचे काम सुरु करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी विशाल खैरे, विजय गायकवाड, आशिष (मुन्ना) शिंदे, पारुनाथ ढोकळे, अजय गायकवाड, विजय गाडळकर, महेंद्र शिंगवी, नईम खान, पांडू जपकर, कारभारी कवडे, सोमनाथ जपकर, पोपट सानप, हरी गाढवे, बबलू सहानी, नंदू म्हस्के, महेश ससाणे, सागर साळवे, अश्विनी ससाणे, भारती भणगे, दीपक कवडे, नारायण कवडे, राजेंद्र दळवी, ललित जैन, अनिता जपकर, विशाल कवडे, विनोद कवडे, कुलदीप कुलकर्णी, जयश्री कवडे, राहुल जपकर, कल्पना कवडे, रूपाली कवडे, राणी कवडे आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ॲड. अभय आगरकर म्हणाले की, शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना, पालकमंत्री व खासदार यांच्या माध्यमातून विविध नागरी प्रश्न सोडविण्यात येत आहे. कवडे वस्ती येथे पुरेश्या दाबाने विद्युत पुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तर अनेकवेळा वीज जात असल्याने समस्यांना सामोरे जावे लागत होते. या त्रासाने घरात राहणाऱ्या महिला वर्ग कंटाळले होते. हा प्रश्न देखील पालकमंत्री व खासदार यांच्या माध्यमातून सोडविण्यात आलेला आहे. उर्वरीत या भागातील प्रश्न देखील सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
स्थानिक महिलांनी यावेळी ड्रेनेज लाईन व पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी आगरकर यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली व सदर प्रश्नावर आयुक्तांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले. जिव्हाळ्याचा वीज प्रश्न सोडविल्याबद्दल स्थानिक महिलांनी दत्ता गाडळकर यांचे विशेष आभार मानले.
दत्ता गाडळकर म्हणाले की, पालकमंत्री व खासदार विखे यांच्या माध्यमातून शहरातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यात येत आहे. नवीन ट्रांसफार्मरमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, उन्हाळ्यात वारंवार वीज जाण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे. या भागातील इतर प्रश्न देखील लवकरच सोडविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.